(Goan Players welcomes at Dabolim Airport)  Dainik Gomantak
क्रीडा

जागतिक पदकविजेते दाखल! ढोल, ताशांच्या गजरात गोव्याच्या ‘स्पेशल’ खेळाडूंचे स्वागत

बर्लिनमधील स्पर्धेत नऊ सुवर्णांसह 19 पदकांची सर्वोत्तम कामगिरी

किशोर पेटकर

Goan Players wins 19 medals in Berlin Special Summer Olympic 2023 :

स्पेशल ऑलिंपिक जागतिक उन्हाळी स्पर्धेत सर्वाधिक नऊ सुवर्णांसह एकूण 19 पदके जिंकण्याची सर्वोत्तम कामगिरी गोमंतकीय ‘स्पेशल’ क्रीडापटूंनी साधली. पदकविजेत्यांसह राज्यातील सहभागी जिगरबाज खेळाडूंचे बुधवारी संध्याकाळी दाबोळी विमानतळावर ढोल, ताशांच्या गरजात आणि पाठिराख्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात जंगी स्वागत झाले.

(Goan Players welcomes at Dabolim Airport)

राज्यातील 13 क्रीडापटूंसह 23 गोमंतकीय स्पेशल ऑलिंपिक्स भारत संघाचे सदस्य होते. जर्मनीतील बर्लिन येथे 17 ते 25 जून या कालावधीत स्पर्धा झाली. भारताला दोनशेहून जास्त पदके मिळाली. त्यात गोमंतकीयांच्या नऊ सुवर्ण, प्रत्येकी पाच रौप्य व ब्राँझपदकांचा समावेश होता.

खेळाडूंचे शानदार स्वागताचे आयोजन राज्य दिव्यांगजन आयोगातर्फे करण्यात आले. यावेळी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, हळदोणेचे आमदार कार्लोस फरेरा, राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, राज्य दिव्यांगजन आयोग कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक, समाज कल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

जल्लोषाने खेळाडू भारावले

स्पेशल खेळाडूंच्या अभूतपूर्व कामगिरीला दाद देण्यासाठी भर पावसात दाबोळी विमानतळाबाहेर राज्यभरातून दोनशेहून जास्त पाठीराखे जमा झाले होते. यामध्ये खेळाडूंचे पालक, कुटुंबीयही होते. खेळाडूंच्या देदीप्यमान कामगिरीचे कौतुक करताना साऱ्यांचा उत्साह ओसंडत होता. विमानतळाबाहेर पडलेले खेळाडू जल्लोषी वातावरणात भारावून गेले.

अभिमानास्पद कामगिरी ः फळदेसाई

‘‘बर्लिनमध्ये गोव्याच्या खेळाडूंनी जे काही साध्य केले त्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या कौशल्याचा आणि परिश्रमाचा मी साक्षीदार ठरलो, त्यावरून निश्चितपणे सांगू शकतो, की त्यांनी आम्हाला आत्मनिर्धार आणि सकारात्मकतेची जाणीव करून दिली आहे.

राज्य आणि देशासाठी हे निकाल मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा गोव्याला सार्थ अभिमान आहे,” मंत्री सुभाष फळदेसाई यांनी खेळाडूंचे कौतुक करताना सांगितले.

संघातील अधिकाऱ्यांची प्रशंसा

राज्य दिव्यांगजन आयोगाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी स्पेशल खेळाडूंच्या प्रगतीसाठी मेहनत घेतलेले स्पेशल ऑलिंपिक भारतचे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हिक्टर वाझ, स्पेशल ऑलिंपिक गोवाचे अध्यक्ष लुईस फर्नांडिस, वृषाली कार्दोझ, तसेच इतर अधिकाऱ्यांची दखल घेत त्यांची प्रशंसा केली. “

अनेक जण पदकांसह मायदेशी परतले, संपूर्ण चमूने अतुलनीय आत्मविश्वास आणि दृढनिश्चय प्रदर्शित प्रेम आणि आदर प्राप्त केला आहे. आमचे कार्यालय त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही जेणेकरून पुढच्या वेळी आमची पदकांची संख्या वाढेल,” अशी ग्वाही पावसकर यांनी दिली.

पदकविजेते गोमंतकीय

सुवर्णपदके (9) ः गीतांजली नागवेकर (800 मीटर), सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंगमध्ये 2), मॅन्फिल फेर्राव (बास्केटबॉल), वीणा नाईक (व्हॉलिबॉल), व्हेन्सन पेस, अमन नदाफ, फ्रान्सिस पारिसापोगू व ज्योएल रॉड्रिग्ज (सर्व फुटबॉल).

रौप्यपदके (5) ः गीतांजली नागवेकर (400 मीटर), सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), आयुष गडेकर (व्हॉलिबॉल), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), अस्लम गंजानावार (ज्युदो).

ब्राँझपदके (5) ः सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), गेबान मुल्ला (भालाफेक), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), गायत्री फातर्पेकर व काजल जाधव (दोघी महिला फुटबॉल).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॅटरीचा राजा येतोय! Redmi 15 5G लाँचिंगसाठी सज्ज, 7000mAh बॅटरी करणार कमाल; जाणून घ्या अफलातून फीचर्स

IND vs ENG: भारतासाठी ओव्हल 'लकी' की 'अनलकी'? कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? गिल सेना करणार मोठा चमत्कार

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Lung Cancer: फुफ्फुसाच्या कर्करोगाचा तरुणाईला विळखा, 50 वर्षांखालील 21 टक्के लोकांना जखडलं; जाणून घ्या का वाढतोय धोका?

Goa Assembly: गोव्याच्या पर्यटन क्षेत्रात वाढ, जून 2025 पर्यंत 54.5 लाख पर्यटकांची नोंद, मंत्री रोहन खंवटेंची माहिती; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT