गेल्या पाच वर्षांपासून स्टेडियम तशाच स्थितीत असून अद्याप काम पूर्ण झालेले नाही. Dainik Gomantak
क्रीडा

Goa: वेळ्ळीत फुटबॉल स्टेडियमचे काम रेंगाळले

सिल्वा (Silva) यांच्‍यानंतर वेळ्ळीत फिलिप नेरी रॉड्रिग्‍स (Philip Neri Rodriguez) निवडून आले. पण त्‍यांच्‍या काळात या स्‍टेडियमच्‍या (Football stadium) कामाला गती मिळाली नाही. सिल्वा यांनी तरी लक्ष घालून स्टेडियम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, असे फा. अॅलन तावारीस यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: वेळ्ळी (Velli) मतदारसंघात दहा वर्षांपूर्वी फुटबॉल स्टेडियम (Football stadium) उभारण्याच्या प्रकल्पाला (Project) सुरुवात करण्यात आली होती. हे स्टेडियम साधनसुविधांनी युक्त असून फक्त फुटबॉल मैदान उभारण्याचे काम बाकी राहिले आहे. गेल्या पाच वर्षांपासून स्टेडियम तशाच स्थितीत असून अद्याप काम पूर्ण झालेले नाही. वेळ्ळीतील युवा खेळाडूंच्या भविष्‍यासाठी हे स्टेडियम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी वेळ्ळीवासीयांनी केली आहे.

वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांनी या फुटबॉल स्टेडियमच्या बांधकामाला सुरुवात केली होती. या स्टेडियमवर खेळाडूंसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध असून फक्त फुटबॉल मैदान उभारण्याचे काम बाकी आहे. सिल्वा यांच्‍यानंतर वेळ्ळीत फिलिप नेरी रॉड्रिग्‍स निवडून आले. पण त्‍यांच्‍या काळात या स्‍टेडियमच्‍या कामाला गती मिळाली नाही. सिल्वा यांनी तरी लक्ष घालून स्टेडियम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, असे फा. अॅलन तावारीस यांनी सांगितले.

फुटबॉल स्टेडियम उभारण्यात येणाऱ्या जागेत अगोदर शेती करण्यात येत होती. नंतर या ठिकाणी कार्यक्रम तसेच फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. पण, जेव्हा बेंजामिन सिल्वा हे आमदार म्हणून निवडून आले तेव्‍हा त्यांनी या ठिकाणी फुटबॉल स्टेडियम उभारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास लोकांकडूनही भरघोस पाठिंबा मिळाला. स्टेडियमवर साधनसुविधा उभारण्यात आल्या आहेत. पण, याचा लाभ स्थानिकांना मिळत नाही, असे तावारीस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT