Goa women's team defeats Gujarat in cricket Dainik Gomantak
क्रीडा

अंतिम टप्प्यात निर्णायक फलंदाजी, क्रिकेट स्पर्धेत महिलांनी मारली बाजी

क्रिकेट स्पर्धेत महिलांची विजयी सलामी, अंतिम टप्प्यात निर्णायक फलंदाजी

दैनिक गोमन्तक

पणजी : डावातील नऊ चेंडू बाकी असताना विजयासाठी 16 धावांची गरज होती, निर्णायक टप्प्यावर विनवी गुरव व निकिता मळीक यांनी समजूतदार फलंदाजी केली. त्यामुळे गोव्याला सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी विजयी सलामी देता आली.

मोहाली येथील आय. एस. बिंद्रा क्रिकेट (Cricket) स्टेडियमवर प्रकाशझोतात झालेल्या लढतीत गोव्याने एलिट ड गटात गुजरातला चार विकेट्स व एक चेंडू राखून हरवले. गोव्याची कर्णधार शिखा पांडे (2-25) व पूर्वा भाईडकर (2-12) यांनी गुजरातला 7 बाद 103 असे रोखले. नंतर गोव्याने 19.5 षटकांत 6 बाद 104 धावा करून सामना जिंकला.

गोव्याला (goa) विजयासाठी नऊ चेंडूंत 16 धावा हव्या असताना जम बसलेली सुनंदा येत्रेकर (20) बाद झाली. विनवी (नाबाद 20, 19 चेंडू, 2 चाैकार) हिने निकिता (नाबाद 6) हिच्या साथीत एक चेंडू राखून गोव्याला विजय मिळवून दिला. त्यापूर्वी गोव्याचा संघ 4 बाद 46 असा संकटात सापडल्यानंतर कर्णधार शिखा (22) व सुनंदाने संघाला सावरले.

संक्षिप्त धावफलक

गुजरात ः 20 षटकांत 7 बाद 103 (सिमरन 45, रेणुका चौधरी 10, भावना गोपलानी 15, शिखा पांडे 2-25, निकिता मळीक 0-11, सुनंदा येत्रेकर 0-11, पूर्वा भाईडकर 2-12, रुपाली चव्हाण 1-20, संजुला नाईक 0-7, तेजस्विनी दुर्गड 1-14

) पराभूत वि. गोवा ः 19.5 षटकांत 6 बाद 104 (पूर्वजा वेर्लेकर 10, श्रेया परब 12, तेजस्विनी दुर्गड 5, शिखा पांडे 22, संजुला नाईक 6, सुनंदा येत्रेकर 20, विनवी गुरव नाबाद 20, निकिता मळीक नाबाद 6, रेणुका चौधरी 3-23, हिरलबेन सोळंकी 2-11, स्तुती जैन 1-10).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT