तनया नाईक दैनिक गोमन्तक
क्रीडा

Goa Womens Cricket: गोव्याच्या महिला हैदराबादला भिडल्या, गुवाहाटीत विजयी सलामी

गोव्याच्या महिलांनी शानदार अष्टपैलू खेळ केला.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्याच्या सीनियर महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी देताना हैदराबादला 91 धावांनी नमविले. सामना गुवाहाटी येथील नेहरू स्टेडियमवर झाला.

गोव्याच्या महिलांनी शानदार अष्टपैलू खेळ केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गोव्याने 7 बाद 231 धावा केल्या. नंतर हैदराबादला 6 बाद 140 धावांत रोखले.

गोव्याच्या सलामीच्या दोघीही लवकर बाद झाल्यानंतर तनया नाईक (46), सुनंदा येत्रेकर (33), संजुला नाईक (43), श्रेया परब (43) यांच्या शानदार फलंदाजीमुळे गोव्याला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

तनया व सुनंदा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 धावांची, तर तनया व संजुला यांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. तळात विनवी गुरव (17) व पूर्वा भाईडकर (19) यांनीही आक्रमक फलंदाजी केल्यामुळे गोव्याला सव्वादोनशे धावांच्या पुढे जाता आले.

हैदराबादच्या डावात त्रिशा पुजिता (53) व प्रणवी चंद्रा (37) यांनी चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली, पण 189 चेंडूंतील ही भागी खूपच संथ ठरली. त्यामुळे त्यांना 232 धावांचे आव्हान झेपले नाही. त

नया नाईक हिने अष्टपैलू चमक दाखवताना 10 षटकांत फक्त 18 धावा देत एक विकेट प्राप्त केली. कर्णधार सुनंदा येत्रेकरने दोन, तर मेताली गवंडर व पूर्वा भाईडकर यांनीही एक गडी बाद केला. दीक्षा गावडेला विकेट मिळाली नाही, तिनेही खूपच किफायतशीर मारा केला.

संक्षिप्त धावफलक

गोवा: 50 षटकांत 7 बाद 231 (पूर्वजा वेर्लेकर 6, निकिता मळीक 2, तनया नाईक 46, सुनंदा येत्रेकर 33, संजुला नाईक 43, श्रेया परब 43, तेजस्विनी दुर्गड 3, विनवी गुरव नाबाद 17, पूर्वा भाईडकर नाबाद 19, भोगी श्रावणी 3-46)

वि. वि. हैदराबाद: 50 षटकांत 6 बाद 140 (अनुराधा नायक 15, त्रिशा पुजिता 53, प्रणवी चंद्रा 37, निकिता मळीक 2-0-15-0, मेताली गवंडर 7-1-22-1, पूर्वा भाईडकर 10-2-29-1, दीक्षा गावडे 10-1-23-0, तनया नाईक 10-2-18-1, सुनंदा येत्रेकर 10-0-30-2, संजुला नाईक 1-0-3-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kala Academy: 'कला अकादमीची काय दुरुस्‍ती केली'? खंडपीठाने मागितला अहवाल; अधिकाऱ्यांना देखरेख ठेवण्याचे निर्देश

Hindi Din 2025: मराठीनंतर जन्मलेली 'हिंदी' जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा कशी झाली?

Nepal Interim PM: सुशीला कार्की यांनी रचला इतिहास, बनल्या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान VIDEO

Education Recruitment Scam: शिक्षण खात्यांत नोकर भरती प्रक्रियेंत घोटाळो, गोवा फॉरवर्डचो आरोप; Watch Video

Kelbai Goddess: हणजुणे धरणाच्या निर्मितीनंतर गाव जलाशयाखाली बुडाला, कदंबकालीन गुळ्ळेची 'केळबाय'

SCROLL FOR NEXT