IND vs NZ: भारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसऱ्या वनडेपूर्वीच आली मोठी बातमी, रोहितचं जाणार कर्णधारपद!

Indian Cricket Team Captain, ODI World Cup 2023: भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळत आहे.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Cricket Team Captain, ODI World Cup 2023: भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांची क्रिकेट मालिका खेळत आहे. संघाची कमान सलामीवीर रोहित शर्माकडे असून तोही चमकदारपणे नेतृत्व करत आहे. रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याच्या नेतृत्वाखाली संघाला विजय मिळवून दिला.

आता टीम इंडियानेही पहिल्या वनडेत न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव करत मालिकेत आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा वनडे सामना 21 जानेवारीला खेळवला जाणार आहे. याआधीच रोहितच्या कर्णधारपदाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे.

एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहित राहणार कर्णधार?

रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक-2023 पर्यंतच कर्णधारपदाची धुरा सांभाळेल असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. भारताला या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वचषक त्याच्या यजमानपदी खेळायचा आहे. त्या जागतिक स्पर्धेत रोहित टीम इंडियाची कमान सांभाळेल.

Team India
IND vs NZ: 'दिल, दिल, शुभमन गिल...', डबल सेंच्यूरीनंतर Gill वर अभिनंदानाचा वर्षाव, पाहा ट्वीट्स

दुसरीकडे, या स्पर्धेमुळे रोहित शर्माचा भारताच्या वनडे कर्णधारपदाचा कार्यकाळ संपणार आहे. नवनियुक्त उपकर्णधार हार्दिक पंड्या पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापर्यंत (2024) भारताचे मर्यादित षटकांचे कर्णधारपद सांभाळेल.

हार्दिकला मिळणार जबाबदारी!

बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तात, रोहित शर्मा या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारणार असल्याचे म्हटले आहे. रोहित कसोटीतही कर्णधारपद सांभाळेल, अशी बीसीसीआयला आशा आहे. मात्र, त्याच्या कसोटी कर्णधारपदाचा आणि भविष्याचा निर्णय एकदिवसीय विश्वचषकानंतर घेतला जाईल. दरम्यान, कसोटी कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याच्या शर्यतीत केएल राहुल आघाडीवर आहे.

Team India
IND vs NZ: शानदार, जबरदस्त, जिंदाबाद...! सेलिब्रेशननंतर Gillच्या द्विशतकाचे टीम इंडियाने गायले गोडवे

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने एक मोठी गोष्ट सांगितली

बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने या अहवालात म्हटले आहे की, 'सध्या रोहित यंदाच्या विश्वचषकात भारताचे नेतृत्व करेल. पुढे काय करायचे याचे नियोजन केले पाहिजे. पुढचा कर्णधार कोण होणार? फक्त गोष्टी घडण्याची प्रतीक्षा करु शकत नाही.

Team India
IND vs NZ, 3rd ODI: टीम इंडियाचं मालिका विजयाचं स्वप्न भंगलं! पावसाची जोरदार 'बॅटिंग'

तसेच, 2023 च्या विश्वचषकानंतर रोहितने वनडे फॉर्मेट किंवा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यास, आम्हाला योजना बनवण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, 'हार्दिक कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com