पणजी : गोव्याच्या महिलांना अखिल भारतीय आंतरविभागीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले. अंतिम लढतीत मंगळवारी त्यांना मुंबईकडून पराभव पत्करावा लागला.
तमिळनाडू टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनने भारतीय टेनिस बॉल क्रिकेट महासंघाच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा केट्टी-उटी येथे झाली.
गोव्याने 83 धावा केल्यानंतर मुंबईने एक चेंडू राखून सामना जिंकला. महिलांच्या अंतिम लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 4 बाद 83 धावा केल्या. अमिशा शेटगावकर हिने 20, तर शारदा आरोंदेकर हिने 13 धावा केल्या.
मुंबईने 7.5 षटकांत 4 बाद 84 धावा करून विजेतेपद मिळविले. विंकिता नाईक हिच्या मार्गदर्शनाखालील गोव्याच्या महिला संघाला गोवा क्रीडा प्राधिकरणाचे प्रशिक्षक नीलेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.
गोव्याच्या पुरुष संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यांना केरळने हरविले. गोव्याने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकांत 6 बाद 39 धावा केल्या. अनिल गोस्वामी याने 11, तर वल्लभ नाईकने 10 धावा केल्या. प्रत्युत्तरात केरळने 5.2 षटकांत बिनबाद 40 धावा करून सामना जिंकला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.