बुद्धिबळ स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांसमवेत मान्यवर Dainik Gomantak
क्रीडा

Goa: पार्थ साळवी बुद्धिबळात विजेता

स्पर्धेतील एकूण 15 हजार रुपयांची बक्षिसे मकरंद धुरी व राहत धुरी यांनी पुरस्कृत केली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: बार्देश तालुका पातळीवरील स्वातंत्र्यसैनिक (Freedom fighter) दत्ताराम धुरी स्मृती पहिला खुल्या रॅपिड बुद्धिबळ (chess) स्पर्धेत पार्थ साळवी याने विजेतेपद मिळविले. स्पर्धा बार्देश तालुका बुद्धिबळ संघटना आणि थिवी लायन्स क्लब यांच्यातर्फे मरड-म्हापसा येथील तुलसीराम सभागृहात घेण्यात आली.

विजेत्या पार्थ याला तीन हजार रुपये व करंडक देण्यात आला. मंदार लाड याला उपविजेतेपद (Runner-up) मिळाले. पार्थ व मंदार यांचे आठ फेऱ्यांनंतर समान साडेसात गुण झाले. टायब्रेकर गुणांत पार्थ याला अव्वल स्थान मिळाले. यश प्रभू याला तिसरा क्रमांक मिळाला. स्पर्धेत 16 फिडे एलो मानांकित खेळाडूंसह 80 खेळाडूंनी भाग घेतला. 

साईरुद्र नागवेकर, स्नेहल नाईक, चिन्मय पाटील, गियान डिमेलो, अर्थ कारापूरकर, सयुरी नाईक, महादेव सावंत, ह्रदय मोरजकर, कुणाल नाईक, राघव लाड, आर्यन नाईक, वेद नार्वेकर यांना अनुक्रमे चौथा ते पंधरावा क्रमांक मिळाला. वयोगटात एकांग मालवणकर, नॅथन फाचो, नव्या नार्वेकर, वेदांत नार्वेकर, श्रमा मोरुडकर, ईशान जोशी, एमिली पिंटो, श्लोक धुळापकर, अवनी हेगडे यांना, व्हेटरन गटात सुहास अस्नोडकर, तर महिला कनक प्रभू मोये हिला, तसेच वीर भोबे व जीत गावकर यांना विशेष बक्षीस मिळाले.

स्पर्धेतील एकूण 15 हजार रुपयांची बक्षिसे मकरंद धुरी व राहत धुरी यांनी पुरस्कृत केली होती. स्पर्धेत अरविंद म्हामल, अविनाश मालवणकर व नीलेश धारगळ यांनी आर्बिटर म्हणून कामगिरी बजावली. म्हापशाचे नगरसेवक सुधीर कांदोळकर, बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्वास पिळर्णकर, उपाध्यक्ष शिरीष दिवकर, संयुक्त सचिव डॉ. सुशांत धुळापकर, खजिनदार रामचंद्र परब, सदस्य अजित आवटे, सचिन आरोलकर, तसेच रवींद्र धुरी, मनीषा धुरी, सुहास धुरी, शांती धुरी यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले. स्पर्धेचे उद्‍घाटन डिस्ट्रिक्ट 317 बी लायन क्लब इंटरनॅशनलचे (International) विभाग अध्यक्ष अश्विनकुमार कर्पे यांच्या हस्ते झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT