Goa cricket  Dainik Gomantak
क्रीडा

BCCI: देशांतर्गत मोसमात नियोजित वेळापत्रकानुसार गोवा खेळणार सत्तरहून अधिक सामने

Goa Cricket: कोविड निर्बंधांमुळे 2021-22 मोसम बीसीसीआयला मर्यादित स्वरुपात खेळवावा लागला होता.

दैनिक गोमन्तक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बीसीसीआय (BCCI) 2022-23 देशांतर्गत मोसमातील नियोजित क्रिकेट वेळापत्रकानुसार गोवा विविध वयोगटात मिळून सत्तरहून जास्त सामने खेळेल. साखळी फेरीत सर्वाधिक 21 लढती सीनियर पुरुष संघाच्या असतील.

सर्व वयोगटातील साखळी फेरीत मिळून गोव्याच्या वेगवेगळ्या संघांना साखळी फेरीत एकूण 72 सामने खेळावे लागतील. बाद फेरी गाठल्यास सामन्यांची संख्या वाढेल. बीसीसीआयने यंदापासून 16 वर्षांखालील महिला गटात स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे. या स्पर्धेत गोव्याचा सहभाग दक्षिण विभागात झाल्यास एकूण सामन्यांच्या संख्येत आणखी सहा लढतींची भर पडू शकेल.

युवक संघाचीही बाद फेरी

गोव्याचा 25 वर्षांखालील युवक (Youth) संघ मोसमात 13 सामने खेळेल. यामध्ये एकदिवसीय स्पर्धेतील सहा व कर्नल सी. के. नायडू करंडक चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील सात लढतींचा समावेश आहे. गतमोसमात या वयोगटातील संघाने धडाकेबाज खेळ करताना उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

* सीनियर पुरुष संघाकडे लक्ष-

गोव्याच्या सीनियर पुरुष क्रिकेट संघांची मोहीम 11 ऑक्टोबरपासून सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेद्वारे होईल. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विजय हजारे करंडक एकदिवसीय, तर डिसेंबरमध्ये रणजी करंडक चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत गोव्याचा संघ खेळेल. तिन्ही प्रकारात प्रत्येकी सात मिळून एकूण 21 सामने सीनियर संघ खेळेल. सिद्धेश लाड, अर्जुन तेंडुलकर या ‘तारांकित’ मुंबईकर पाहुण्या क्रिकेटपटूंमुळे गोव्याच्या संघाकडे स्पर्धेच्या कालावधीत लक्ष असेल.

गतमोसमात कमी सामने-

कोविड निर्बंधांमुळे 2021-22 मोसम बीसीसीआयला मर्यादित स्वरुपात खेळवावा लागला होता. गोव्याचा सीनियर पुरुष संघ एकूण 13 सामने खेळला होता. यामध्ये टी-20 आणि एकदिवसीय स्पर्धेत प्रत्येकी पाच, तर रणजी स्पर्धेत तीन सामन्यांचा समावेश होता. मोसमात गोव्याच्या सीनियर संघाने एकूण तीन सामने जिंकले.

सीनियर महिलांची प्रगती-

गोव्याचा सीनियर महिला क्रिकेट (Cricket) संघ यंदा एकदिवसीय स्पर्धेत सहा आणि टी-20 स्पर्धेत सात मिळून एकूण 13 सामने खेळेल. गतमोसमात महिला संघाने दोन्ही स्पर्धांत चमक दाखविताना उपउपांत्यपूर्व फेरीपर्यंत प्रगती साधली होती. गोव्याच्या महिला संघाने दोन्ही प्रकारातील मिळून 12 सामन्यांत आठ विजय नोंदविले होते.

* गोव्याच्या नियोजित साखळी लढती-

(21) सीनियर पुरुष, (13) 25 वर्षांखालील पुरुष, (10) 19 वर्षांखालील पुरुष, (05) 16 वर्षांखालील पुरुष, (13) सीनियर महिला, (10) 19 वर्षांखालील महिला असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: पाहावं ते नवलंच!! 21 लाखांचा गंडा घातलेल्या माणिकरावचं हार घालून स्वागत; मित्र म्हणतोय "वेलकम टू गोवा सिंघम"

Goa Congress: खासदार विरियातो, प्रदेशाध्यक्ष पाटकर पोलिसांच्या ताब्यात; काँग्रेसचे कॅश फॉर जॉब विरोधात आंदोलन

Goa Today's News Live: मालपे पेडणे येथे आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, पोलिस घटनास्थळी दाखल

IFFI Goa 2024: "आलीयाच्या सुरक्षेसाठी मी त्याला हाकललं होतं" काही तासांतच 'ते' विधान फिरवल्याने इम्तियाज अली वादाच्या भोवऱ्यात

National Cashew Day: गोव्यात काजूचे पीक घेणे का बनत आहे कठीण? कारणे जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT