Rudresh Sharma 
क्रीडा

Cooch Behar Trophy: रुद्रेशमुळे गोव्याची विदर्भावर आघाडी

Goa vs Vidarbha U19: गोव्याविरुद्ध पाहुण्या विदर्भाचा डाव सुस्थितीनंतर गडगडला

किशोर पेटकर

Cooch Behar Trophy, Goa vs Vidarbha U19, 3rd Day Result:

कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोव्याच्या रुद्रेश शर्मा याने विदर्भाचा शतकवीर तुषार सूर्यवंशी याला बाद करून द्विशतकी भागीदारी फोडली. या विकेटसह पाहुण्या विदर्भ संघाने 35 धावांत आठ गडी गमावल्यामुळे यजमान संघाला पहिल्या डावात 31 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या गोव्याच्या पहिल्या डावातील 314 धावांना उत्तर देताना विदर्भाचा डाव कालच्या 2 बाद 129 वरून २८३ धावांत संपुष्टात आला. रविवारी (17 डिसेंबर) तिसऱ्या दिवसअखेर गोव्याने २ बाद ४९ धावा करून एकूण 80 धावांची आघाडी संपादन केली. फिरकी गोलंदाज रुद्रेशने 61 धावांत 5 गडी बाद केले.

डावाला नाट्यमय कलाटणी

तुषार सूर्यवंशी व श्री चौधरी फलंदाजी करत असताना विदर्भाचा संघ गोव्याची धावसंख्या मागे टाकण्याची शक्यता निर्माण झाली होती. या दोघांची द्विशतकी भागीदारी झाल्यानंतर शतक नोंदविलेल्या तुषारला रुद्रेशने चकविले.

विदर्भाच्या या सलामीवीराने वीर यादव याच्या हाती झेल दिला आणि तिसऱ्या विकेटची २०४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. तुषारने 241 चेंडूंत 21 चौकारांच्या मदतीने 135 धावा केल्या.

चार धावांनंतर विदर्भाला आणखी एक झटका बसला. शतकाच्या वाटेवरील श्री याला स्वप्नील गावकरने युवराज सिंग याच्याकरवी झेलबाद केले. श्री याने 203 चेंडूंत 12 चौकारांच्या मदतीने 92 धावा केल्या.

जम बसलेले दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर विदर्भाच्या डावाला गळती लागली. 2 बाद 248 वरून त्यांचा पहिला डाव 283 धावांत संपुष्टात आला व गोव्याला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव: 314

विदर्भ, पहिला डाव (2 बाद 129) : 95.4 षटकांत सर्वबाद 283 (तुषार सूर्यवंशी 135, श्री चौधरी 92, पुंडलिक नाईक 12-5-37-1, स्वप्नील गावकर 20-4-71-1, युवराज सिंग 21-3-74-1, शिवेन बोरकर 5-0-26-0, रुद्रेश शर्मा 29.4-11-61-5, यश कसवणकर 8-3-11-1).

गोवा, दुसरा डाव : 24 षटकांत 2 बाद 49 (वीर यादव 8, शंतनू नेवगी नाबाद 31, निसर्ग नागवेकर 4, दिशांक मिस्कीन नाबाद 6, इकनूर 5-2).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

Rashi Bhavishya 25 November 2024: उद्योजकांसाठी आजचा दिवस खास, मिळणार मोठी डील... तुमच्या राशीत दडलंय काय?

Ranbir Kapoor: राज कपूर फिल्म फेस्टिव्हलची घोषणा! IFFI 2024 मध्ये रणबीरने केलं जाहीर

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

SCROLL FOR NEXT