Cooch Behar Trophy: कुचबिहार करंडकमध्ये गोव्याची त्रिशतकी मजल

Cooch Behar Trophy: जीवन, दिशांकची 129 धावांची शानदार भागीदारी
Cooch Behar Trophy
Cooch Behar TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

Cooch Behar Trophy: जीवन चित्तेम व दिशांक मिस्कीन यांना शतक नोंदविण्याची संधी हुकली, मात्र त्यांनी पाचव्या विकेटसाठी केलेल्या 129 धावांच्या शानदार भागीदारीमुळे कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला सर्वबाद 314 धावा करता आल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर विदर्भानेही चोख प्रत्युत्तर देताना 2 बाद 129 धावा केल्या.

Cooch Behar Trophy
Colva Beach: कोलवा समुद्रकिनारी 'पे पार्किंग' वरून स्थानिकांची लूट: गिरीश चोडणकरांचा आरोप

सांगे येथील जीसीए मैदानावर सामना सुरू आहे. विदर्भाचा संघ पहिल्या डावात अजून 185 धावांनी मागे आहे. शनिवारी गोव्याने 4 बाद 208 वरून पुढे खेळण्यास सुरवात केली. नाबाद फलंदाज दिशांक मिस्कीन व जीवन चित्तेम यांनी दमदार फॉर्म कायम राखताना विदर्भाच्या गोलंदाजांना दाद दिली नाही.

शतकाला बारा धावांची गरज असताना जीवन बाद झाला आणि जम बसलेली जोडी फुटली. जीवन याने 185 चेंडूंत १२ चौकारांच्या मदतीने 88 धावा केल्या.

Cooch Behar Trophy
Veterans T20 Cricket: पाटणेकर वॉरियर्सला वास्कोचे आव्हान

नंतर दिशांक व पुंडलिक नाईक यांनी सहाव्या विकेटसाठी २४ धावांची भर टाकल्यानंतर गोव्याची घसरगुंडी उडाली आणि मोठी धावसंख्या रचण्याचे गोव्याच्या नियोजनास सुरुंग लागला.

यजमान संघाने अखेरच्या पाच विकेट १७ धावांत गमावल्या. दिशांक सर्वांत शेवटी बाद झाला. त्याने २९२ चेंडूंत आठ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ८५ धावा नोंदविल्या.

गोव्याचा डाव चहापानापूर्वी आटोपला. नंतर विदर्भाच्या तुषार सूर्यवंशी (नाबाद ६८) व श्री चौधरी (नाबाद ४३) यांनी किल्ला लढविल्यामुळे विदर्भाला शतकी वेस ओलांडता आली. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची अभेद्य भागीदारी करत गोव्याचे गोलंदाज वरचढ ठरणार नाहीत याची दक्षता घेतली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (४ बाद २०८ वरून) ः १४२ षटकांत सर्वबाद ३१४ (दिशांक मिस्कीन ८५, जीवन चित्तेम ८८, पुंडलिक नाईक ५, शिवेन बोरकर ५, स्वप्नील गावकर ०, युवराज सिंग ०, रुद्रेश शर्मा नाबाद ०, प्रथम महेश्वरी ८६-३, देवांश ठक्कर ७३-२, इकनूर ३१-५).

विदर्भ, पहिला डाव ः ३३ षटकांत २ बाद १२९ (तुषार सूर्यवंशी नाबाद ६८, श्री चौधरी नाबाद ४३, पुंडलिक नाईक ९-५-२३-१, स्वप्नील गावकर ९-१-३५-०, युवराज सिंग ६-१-३४-०, शिवेन बोरकर ४-०-२३-०, रुद्रेश शर्मा ५-१-११-०).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com