Goa`s Tanisha Crasto (R) and Odisha`s Rutuparna Panda.
Goa`s Tanisha Crasto (R) and Odisha`s Rutuparna Panda. Dainik Gomantak
क्रीडा

Goa: तनिशाचा बॅडमिंटन दुहेरीत धडाका

किशोर पेटकर

पणजीः गोव्याची (Goa) प्रतिभाशाली युवा बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो (Tanisha Crasto) हिने ओडिशाच्या (Odisha) ऋतूपर्णा पांडा (Rutuparna Panda) हिच्या साथीत भारतीय बॅडमिंटन (India Badminton) संघ निवड चाचणीत धडाका राखला. आंतरराष्ट्रीय जोडी अश्विनी पोनाप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीस पराभवाचा धक्का दिल्यानंतर शिखा गौतम आणि अश्विनी भट या राष्ट्रीय विजेत्या जोडीस नमवून निवड चाचणी स्पर्धा जिंकली. हैदराबाद येथे निवड चाचणी स्पर्धेत विजयी कामगिरी केल्यामुळे आता तनिशा व ऋतूपर्णा यांचे भारतीय बॅडमिंटन संघातील स्थान जवळपास निश्चित झाले आहे. भारतीय संघ थॉमस व उबेर कप, तसेच सुदिरमन कप स्पर्धेत खेळणार आहे. त्यानिमित्त निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती.

निवड चाचणी स्पर्धेतील अंतिम लढत सोमवारी संध्याकाळी झाली. सबज्युनियर-राष्ट्रीय पातळीवर यशस्वी कामगिरी बजावलेल्या तनिशाने आता सीनियर गटातही छाप पाडण्यास सुरवात केली आहे. त्याबद्दल गोवा बॅडमिंटन संघटनेने तिचे अभिनंदन केले असून सुयश चिंतिले आहे. यापूर्वी तिने ज्युनियर पातळीवर भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांत प्रतिनिधित्व केले आहे. राष्ट्रीय मिश्र दुहेरीतील तनिशा सध्याची विजेती आहे.अंतिम लढतीत तनिशा व ऋतूपर्णा जोडीवर शिखा व अश्विनी भट जोडीवर 21-14, 21-19 असा चमकदार विजय प्राप्त केला. त्यापूर्वी त्यांनी पोनप्पा व सिक्की जोडीस 21-18, 21-18 असे नमविले होते. सुदिरमन कप स्पर्धा फिनलंडमध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, तर थॉमस व उबेर कप स्पर्धा ऑक्टोबरमध्ये डेन्मार्कमध्ये नियोजित आहे.

‘‘तनिशाची कामगिरी गोमंतकीय बॅडमिंटनसाठी भूषणावह आहे. भारत सरकारच्या टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्किम (टॉप्स) अंतर्गत निवड झालेली ती एकमेव गोमंतकीय आहे. निवड चाचणीतील विजेतेपद तनिशा आणि तिच्या सहकारी खेळाडूस भारतीय सीनियर संघात जागा मिळवून देण्यास पुरेशी आहे.’’

- संदीप हेबळे,

सचिव गोवा बॅडमिंटन असोसिएशन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT