Goa Sports : Kickboxing Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports: राष्ट्रीय ‘किक बॉक्सिंग’ स्पर्धेला विरोध

Goa Sports: कोविड-19मुळे म्हापशाचे नगरसेवक ॲड. शशांक नार्वेकर यांचा आक्षेप

दैनिक गोमंतक

म्हापसा : पेडे-म्हापसा (Pedem-Mapusa) येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (Sports Authority of Goa) भाऊसाहेब बांदोडकर क्रीडा संकुलात गुरुवारपासून रविवारपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग (National Kickboxing) स्पर्धेस कोविड-19 कारणास्तव म्हापशाचे नगरसेवक ॲड. शशांक नार्वेकर यांनी विरोध केला आहे. स्पर्धेच्या कनिष्ठ गटातील स्पर्धक 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे असून ते कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणास पात्र नाहीत, असा दावा ॲड. शशांक यांनी केला आहे. त्यांनी सांगितले, की ‘‘यासंदर्भात मी 16 ऑगस्ट रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या स्पर्धेला परवानगी देऊ नये अशी विनंती त्यांना केली होती. स्पर्धेला परवानगी दिलेली नाही, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यानंतर मी यासंदर्भात जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलिस महासंचालक, म्हापसा पोलिस स्थानक इत्यादींना निवेदने सादर करून त्या स्पर्धेला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. तरीही जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी आयोजक सागर रमेश सुर्वे यांना स्पर्धा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. कोविडसंदर्भात खुद्द शासनाने जारी केलेल्या नियमावलीच्या विरोधात हे सर्व झालेले आहे.’’ आपण यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री मनोहर (बाबू) आजगावकर व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. तसेच, म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा यांनीही या बाबतीत कानांवर हात ठेवले, असेही ॲड. शशांक यांनी स्पष्ट केले. स्पर्धेच्या ठिकाणी सध्या स्पर्धा आयोजक तोंडावर मास्क न घालता फिरत आहेत व त्याबाबत आपल्याकडे पुरावे आहेत, असेही ते म्हणाले.

कोविड प्रतिबंधक नियमाचे पालन ः आयोजक

राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धा आयोजन समितीला कोविड-१९ मार्गदर्शक शिष्टाचार उल्लंघनाचा आरोप मान्य नाही. आयोजन समितीची बुधवारी पणजीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी आयोजन समिती प्रमुख सिद्धेश नाईक यांनी सांगितले, की ‘‘स्पर्धेच्या कालावधीत कोविड-19 महामारी संबंधित सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. मार्गदर्शक शिष्टचार नियम पाळले जातील.’’

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेविषयी...

- आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग नियमाची अंमलबजावणी

- स्पर्धेत विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश व निमलष्करी दलाचे खेळाडू

- पुरुष व महिला गटात मिळून 1500 खेळाडू व अधिकारी

- पॉईंट फाईट, लाईट कॉन्टेक्ट, किक लाईट, फुट कॉन्टेक्ट, लो किक, के ओने रुल्स, म्युजिकल फॉर्म्स असे 7 गट

- सीनियर, मास्टर्स गटात चुरस

- सर्वोत्तम खेळाडूंची आगामी आशियाई, जागतिक, तसेच आशियाई इनडोअर स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli Test Retirement: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

SCROLL FOR NEXT