Goa Sports: Goa Olympic Association office bearers congratulate Vasant Prabhudesai on his promotion as Director of Sports and Youth Affairs. Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports: राज्यातील क्रीडापटूंसाठी ‘गुड न्यूज’

Goa Sports: खेळाडूंचे रखडलेले अनुदान देण्यासाठी वेगाने प्रयत्न

दैनिक गोमंतक

पणजी ः क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या (Directorate of Sports and Youth Affairs Goa) संचालकपदी बढती मिळालेले वसंत प्रभुदेसाई (Vasant Prabhudesai) यांनी राज्यातील क्रीडापटू आणि संघटनांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. खेळाडू आणि संघटनांचे रखडलेले अनुदान देण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू असून लवकरच त्याची पूर्तता होणार असल्याचेही ग्वाही त्यांनी सोमवारी दिली. ‘‘खेळाडू आणि संघटनांचे अनुदान लवकरच दिले जाईल. त्यादृष्टीने गोवा क्रीडा प्राधिकरणाची प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेल्या गोमंतकीय खेळाडूंची बक्षीस रक्कमही लगेच दिली जाईल,’’ असे प्रभुदेसाई यांनी सांगितले. ते गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदी कार्यरत आहेत.

गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या (जीओए) शिष्टमंडळाने प्रभुदेसाई यांची भेट घेऊन क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी बढती मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यावेळी प्रभुदेसाई यांनी खेळाडू व संघटनांच्या अनुदानाविषयी माहिती दिली. जीओए शिष्टमंडळात संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता, सदस्य मॅक वाझ, सुनील मोरजकर, राजेंद्र गुदिन्हो, संदीप हेबळे यांचा समावेश होता.

‘पुस्तक लिहिण्याचे नियोजन’

गोमंतकीय क्रीडा प्रशासनात दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर वसंत प्रभुदेसाई येत्या वर्षी निवृत्त होणार आहेत. ‘‘निवृत्तीनंतर बऱ्याच गोष्टींचे नियोजन माझ्या मनात आहे. विद्यार्थी आणि युवा क्रीडापटूंना मार्गदर्शन करणे, पुस्तक लिहिणे यांना प्राधान्य असेल,’’ असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT