Goa Sports : Bruno Coutinho playing Cricket. Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports: फुटबॉलपटू ब्रुनो यांचे क्रिकेट कौशल्य!

Goa Sports: पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुल मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट सामना

दैनिक गोमंतक

पणजीः गोव्याचे अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू ब्रुनो कुतिन्हो (Bruno Coutinho) यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानावरील पराक्रमासाठी ओळखले जाते, ते भारताचे माजी फुटबॉल संघ कर्णधार आहेत. सोमवारी त्यांनी पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुल मैदानावर टेनिस बॉल क्रिकेटमधील (Tennis Ball Cricket) कौशल्य प्रदर्शित करून लक्ष वेधले. निमित्त होते, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या (Sports Authority of Goa) क्रीडा आणि तंदुरुस्ती सप्ताहानिमित्त घेतलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या उद्‍घाटनाचे. प्राधिकरणाचे प्रशिक्षण संचालकब्रुनो स्पर्धेचे उद्‍घाटक होते.

स्पर्धेचे उद्‍घाटन झाल्यानंतर ब्रुनो यांनी थोडा वेळ क्रिकेट गुणवत्ता आजामावून पाहिली. क्रिकेट खेळण्याची हौस त्यांनी भागवून घेतली. हातात बॅट घेऊन मैदानावर उतरल्यानंतर फुटबॉलमध्ये ज्या सहजतेने गोल करायचे, त्याच धडाक्याने ब्रुनो यांनी क्रिकेटमध्ये फटकेबाजी केली. डाव प्रदर्शनीय असला, तरी फुटबॉलपटू ब्रुनो क्रिकेटमधील फलंदाजीतही चांगलेच तरबेज असल्याचे सिद्ध झाले. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्‍घाटनास ब्रुनो यांच्या व्यतिरिक्त म्हापशाचे नगरसेवक विकास आरोलकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, पोलिस निरीक्षक राहुल परब, क्रीडा प्राधिकरणाच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्टेफी कार्दोझ, फोंडा विभागचारचे प्रमुख नीलेश नाईक, अभियंता दीपक लोटलीकर यांचीही उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची कृपा! सिंह, धनुसह 'या' 4 राशींना होणार लाभ; वाचा 12 राशींचे राशिभविष्य

Sangameshwar Chalukya Dynasty: संगमेश्वरच्या चालुक्य राजघराण्याचा पराक्रमी इतिहास! पोर्तुगीज आणि आदिलशाहीला दिले होते कडवे आव्हान

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

SCROLL FOR NEXT