Goa Sports:  आयएसएल फुटबॉल लढतीत शुक्रवारी एफसी गोवाविरुद्ध दोन गोल केलेला जमशेदपूर एफसीचा नेरियूस व्हाल्सकिस.
Goa Sports: आयएसएल फुटबॉल लढतीत शुक्रवारी एफसी गोवाविरुद्ध दोन गोल केलेला जमशेदपूर एफसीचा नेरियूस व्हाल्सकिस. Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाचा पुन्हा धुव्वा..!

दैनिक गोमन्तक

पणजी Goa Sports : लिथुआनियन स्‍ट्रायकर नेरियूस व्हाल्सकिस याच्या दोन गोलच्या बळावर जमशेदपूर एफसीने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमात एफसी गोवाचा (Goa) धुव्वा उडविला. बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर शुक्रवारी (Friday) त्यांनी 3-1 फरकाने चमकदार विजय प्राप्त केला व गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविले.

हुआन फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखालील एफसी गोवाचा हा सलग दुसरा पराभव ठरला. पहिल्या लढतीतही त्यांना मुंबई सिटीकडून 0-3 फरकाने नामुष्कीजनक हार पत्करावी लागली होती. जमशेदपूरला अगोदरच्या लढतीत ईस्ट बंगालने 1-1 गोलबरोबरीत रोखले होते. शुक्रवारी त्यांनी उत्तरार्धात एफसी गोवाच्या बचावफळीस पूर्णतः निष्प्रभ ठरवत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत.

आयएसएल स्पर्धेत यापूर्वीच्या चार लढतीत जमशेदपूरला एफसी गोवाकडून हार पत्करताना 15 गोल स्वीकारावे लागले होते, पण शुक्रवारी ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखालील संघ सर्व क्षेत्रात वरचढ ठरला. जमशेदपूरसाठी व्हाल्सकिसने अनुक्रमे 51 व 61व्या, तर बदली खेळाडू ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने 80व्या मिनिटास गोल केला. जमशेदपूरच्या व्हाल्सकिस आणि स्कॉटलंडचा ग्रेग स्टुअर्ट यांनी उत्कृष्ट समन्वय साधत एफसी गोवाला चांगलेच सतावले आणि यशही प्राप्त केले. एफसी गोवाचा सामन्यातील एकमात्र गोल स्पॅनिश बदली खेळाडू ऐरान काब्रेरा याने 86व्या मिनिटास नोंदविला.

व्हाल्सकिसचा धडाका

जमशेदपूर एफसीतर्फे दुसरा मोसम खेळणाऱ्या व्हाल्सकिसने उत्तरार्धात धडाकेबाज खेळ केला. दहा मिनिटात दोन गोल नोंदवून त्याने एफसी गोव्याच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. 2019-20 मोसमात चेन्नईयीन एफसीकडून खेळताना आयएसएल स्पर्धेत 15 गोलसह गोल्डन बूट जिंकलेल्या व्हाल्सकिसने रोखणे एफसी गोवाच्या बचावफळीस रोखणे शक्य झालेच नाही. या 34 वर्षीय आघाडीपटूने आता आयएसएलच्या तिसऱ्या मोसमात 40 सामन्यांतून 25 गोल केले आहेत. पहिल्या गोलवेळेस व्हाल्सकिसने ग्रेग स्टुअर्टच्या क्रॉसपासवर डाव्या पायाच्या फटक्यावर चेंडूला अचूक दिशा दाखविली. व्हाल्सकिसने दुसरा गोल सेटपिसेसवर केला. स्टुअर्टच्या फ्रीकिकवर लिथुआनियन खेळाडूचे हेडिंग भेदक ठरले.

मैदानावर येताच गोल

जमशेदपूरचा बदली खेळाडू ऑस्ट्रेलियन जॉर्डन मरे याने मैदानावर येताच संघाची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. त्याचा हा मोसमातील पहिलाच, तर आयएसएलमधील २१ लढतीतील आठवा गोल ठरला. 80व्या मिनिटा ग्रेग स्टुअर्टची जागा घेतलेल्या या 26 वर्षीय खेळाडूने खोलवर शानदार मुसंडी मारत गोलरक्षक धीरज सिंगला चकवा दिला.

एफसी गोवाची पिछाडी कमी

एफसी गोवाचा नवा स्पॅनिश आघाडीपटू ऐरान काब्रेरा याने सामना संपण्यास चार मिनिटे असताना संघाची पिछाडी एका गोलने कमी केली. 82व्या मिनिटास इव्हान गोन्झालेझची जागा घेतलेल्या या बदली खेळाडूचा आयएसएल स्पर्धेतील हा पहिलाच गोल ठरला. स्पॅनिश सहकारी होर्गे ओर्तिझ याच्या असिस्टवर हा गोल झाला आणि एफसी गोवास थोडाफार दिलासा मिळाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT