<div class="paragraphs"><p>FC Goa: आयएसएल फुटबॉल लढतीत रविवारी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरीचा गोल केल्यानंतर आपल्या खास शैलीत आनंद व्यक्त करताना एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया.</p></div>

FC Goa: आयएसएल फुटबॉल लढतीत रविवारी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध बरोबरीचा गोल केल्यानंतर आपल्या खास शैलीत आनंद व्यक्त करताना एफसी गोवाचा कर्णधार एदू बेदिया.

 

Dainik Gomantak 

क्रीडा

'एफसी' गोवाची पिछाडीवरून आघाडी..

दैनिक गोमन्तक

पणजी: सामन्यातील वीस मिनिटांच्या खेळात दोन गोलने मागे पडल्यानंतर एफसी गोवा (FC Goa) संघ पुन्हा पराभूत होणार असेच संकेत मिळू लागले, पण डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने जोरदार मुसंडी मारली आणि इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात केरळा ब्लास्टर्सला 2-2 गोलबरोबरीत रोखले. रविवारचा सामना वास्को येथील टिळक मैदानावर झाला.

एफसी गोवाने (FC Goa) पिछाडीनंतर दहा मिनिटांत दोन गोल करून एका गुणाची प्राप्ती केली. होर्गे ओर्तिझ याने 28व्या मिनिटास गोल केल्यानंतर कर्णधार एदू बेदिया याने 38व्या मिनिटास थेट कॉर्नर फटक्यावर एफसी गोवास बरोबरी साधून दिली. त्यापूर्वी जीकसन सिंग याने याने 10व्या, तर उरुग्वेच्या ॲड्रियन लुना याने 20व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे केरळा ब्लास्टर्सचे पारडे जड झाले होते.

सामन्याच्या 75व्या मिनिटास देवेंद्र मुरगावकर याने समोर केवळ गोलरक्षक असताना संधी साधली असती, तर एफसी गोवाने कदाचित सामना जिंकलाही असता. त्यानंतर 87व्या मिनिटास एदू बेदियाचा फ्रीकिक फटका गोलपट्टीस आपटल्यामुळे एफसी गोवाची आणखी एक चांगली संधी वाया गेली.

केरळा ब्लास्टर्स सलग आठव्या सामन्यात अपराजित राहिला, पण त्यांना लागोपाठ दुसऱ्या लढतीत बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे गुणतक्त्यातील अव्वल स्थानावरील मुंबई सिटी संघाला गाठणे त्यांना शक्य झाले नाही. केरळा ब्लास्टर्सची ही नऊ लढतीतील पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 14 गुण झाले असून तिसरा क्रमांक मिळाला आहे. एफसी गोवाने नऊ लढतीतील तिसरी बरोबरी नोंदविली. त्यांचे नऊ गुण झाले असून नवव्या क्रमांकावर राहावे लागले. बंगळूर एफसीचेही तेवढेच गुण आहे, पण त्यांची गोलसरासरी चांगली असल्याने ते आठव्या स्थानी आहेत.

एफसी गोवाची मुसंडी

एफसी गोवाने 0-2 असे मागे पडल्यानंतर जबरदस्त मुसंडी मारत पूर्वार्धात बरोबरी साधली. स्पॅनिश होर्गे ओर्तिझ याने मोसमातील तिसरा गोल केला. सेवियर गामा याच्या असिस्टवर ओर्तिझ याचा फटका खूपच वेगवान ठरला. कर्णधार एदू बेदियाने थेट कॉर्नर फटक्यावर संघाचा दुसरा गोल केला. स्पॅनिश मध्यरक्षकाचा हा गोल अफलातून ठरला. केरळा ब्लास्टर्सचा गोलरक्षक प्रभसुखन गिल याला चेंडूचा अजिबात अंदाज आला नाही, त्यामुळे बेदियाला मोसमातील पहिला गोल नोंदविणे शक्य झाले.

केरळाची (Kerala) जबरदस्त सुरवात

एफसी गोवाचा बचाव कमजोर आहे याची जाणीव असल्याने केरळा ब्लास्टर्सने सुरवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकण्यास प्राधान्य दिले. सेटपिसवर गोलरक्षक धीरज सिंग पुन्हा एकदा असफल ठरला. ॲड्रियन लुना याच्या कॉर्नर फटक्यावर वीस वर्षीय मध्यरक्षक जीकसन सिंग याचे हेडिंग भेदक ठरले. चौदा मिनिटानंतर उरुग्वेच्या ॲड्रियन लुना याने लाजबाव गोल करून केरळा ब्लास्टर्सची स्थिती मजबूत केली. बंदुकीच्या गोळीप्रमाणे सुसाट ठरलेल्या ‘लाँग रेंजर’ फटक्यासमोर गोलरक्षक धीरज साफ हतबल ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao Election Result: ताळगावमधून युनायटेड ताळगावकरचा सुफडा साफ, मंत्री बाबूश यांचे पॅनल विजयी

Sattari News : सत्तरीत तालुक्यात नदी परिसरात जिलेटिनचा धोका वाढला; जलप्रदूषणाची शक्यता

Air Pollution: वायू प्रदूषणानं वाढवली चिंता! टाईप 2 डायबिटीजच्या रुग्णांमध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांनी वाढ; संशोधनातून खुलासा

Goa Today's Live News Update: लाच, खंडणी प्रकरण! पिळगावकरांना न्यायालयीन कोठडी

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

SCROLL FOR NEXT