2021 च्या सर्वोत्तम कसोटी संघात पाकिस्तानी क्रिकेटपटूने चार भारतीयांना दिले स्थान

त्याने निवडलेल्या 12 जणांच्या संघात चार भारतीय खेळाडू आहेत.
Pakistani cricketer gave place to four Indians in best test team of 2021

Pakistani cricketer gave place to four Indians in best test team of 2021

Dainik Gomantak

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया याने 2021 चा त्याचा आवडता सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे. कनेरियाने आपल्या संघात 12 खेळाडूंची निवड केली, मात्र त्यात भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांचा समावेश नाही. त्याने निवडलेल्या 12 जणांच्या संघात चार भारतीय खेळाडू आहेत, तर पाकिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा त्यात समावेश आहे.

दानिश कनेरियाने (Danish Kaneria) रोहित शर्मा आणि केएल राहुलला त्याच्या संघात सलामीवीर म्हणून निवडले, तर त्याच्याकडे दिमुथ करुणारत्ने आणि आबिद अलीसारख्या खेळाडूंचा पर्यायही होता. 2021 मध्ये रोहितने 11 कसोटी सामन्यांमध्ये 2 शतके आणि 4 अर्धशतकांसह 906 धावा केल्या. दुसरीकडे, केएल राहुलने पाच कसोटी सामन्यांमध्ये 46.10 च्या सरासरीने 461 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि एक अर्धशतक आहे. कनेरियाने आपल्या संघात तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून इंग्लंडचा कर्णधार जो रूटची निवड केली. जो रूटने 2021 साली कसोटी क्रिकेटमध्ये सहा शतकांसह सर्वाधिक 1708 धावा केल्या.

<div class="paragraphs"><p>Pakistani cricketer gave place to four Indians in best test team of 2021</p></div>
WWE स्टार रोमन रेन्स कोरोना पॉझिटिव्ह, ब्रॉक लेसनर विरुद्धच्या लढतीला ब्रेक

त्याचवेळी कनेरियाने केन विल्यमसनचीही आपल्या संघात निवड केली आणि त्याला आपल्या आवडत्या कसोटी संघाचा कर्णधार बनवले. त्याने पाकिस्तानच्या फवाद आलमची संघात पाचव्या क्रमांकाची फलंदाज म्हणून निवड केली तर ऋषभ पंतची यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून संघात निवड झाली. यानंतर त्याने आपल्या संघात काईल जेमिसन आणि आर अश्विनला अष्टपैलू म्हणून स्थान दिले. अश्विनने 2021 मध्ये कसोटी फॉर्मेटमध्ये सर्वाधिक 54 विकेट घेतले. त्यानंतर त्याने जेम्स अँडरसन, जोस हेझलवूड आणि शाहीन शाह आफ्रिदी यांना वेगवान गोलंदाज म्हणून निवडले, तर ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनची संघातील 12 वा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.

दानिश कनेरियाचा 2021 चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, जो रूट, केन विल्यमसन, फवाद आलम, ऋषभ पंत, काइल जेमिसन, आर अश्विन, जेम्स अँडरसन, जोश हेझलवूड, शाहीन आफ्रिदी, मार्नस लॅबुशेन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com