टीम इंडियाच्या क्रिकेटर्सची प्रेमकहाणी चाहत्यांना आवडते. पण काही गोष्टी अशा असतात ज्या प्रत्येकाला माहीत नसतात. आम्ही तुम्हाला अशाच काही रंजक गोष्टी सांगत आहोत, ज्या टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंच्या प्रेमकथेशी (Love Story) संबंधित आहेत. यामध्ये विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, शिखर धवन आणि युवराज सिंग यांचा समावेश आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्माची प्रेमकहाणी चाहत्यांना खूप आवडली. ही जोडी चांगलीच आवडली होती. 2013 मध्ये विराट पहिल्यांदा अनुष्का शर्माला भेटला होता. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. तेव्हापासून दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. विराट-अनुष्काने 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते.
क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्या सचिन तेंडुलकर आणि अंजलीची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. 1990 साली सचिन इंग्लंड दौऱ्यावरून परतला. यादरम्यान मुंबई विमानतळावर त्याची अंजलीची भेट झाली आणि इथूनच दोघांची कहाणी सुरू झाली. यानंतर दोघांनी 1994 मध्ये एंगेजमेंट केले आणि 1995 मध्ये लग्न केले. अंजली व्यवसायाने डॉक्टर होती. ती सचिनपेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.
युवराज सिंग आणि हेजल कीचची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. एका मुलाखतीत युवराजने सांगितले होते की, हेजलचा मित्र होण्यासाठी त्याला अनेक महिने लागले. हेजलने तीन महिने फेसबुकवर युवीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही. दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. यानंतर बोलण्याचा सिलसिला सुरू झाला आणि नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर 2016 मध्ये युवराजने हेजलसोबत लग्न केले.
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह अनेकदा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने एकत्र दिसतात. रितिका लग्नापूर्वी स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती. त्यामुळे दोघे अनेकदा भेटत असत. त्यानंतर दोघांची मैत्री झाली. रोहित आणि रितिका यांनी जवळपास 6 वर्षे डेट केले आणि त्यानंतर 2015 मध्ये लग्न केले.
बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे हिला चक दे इंडिया या चित्रपटातून चांगलीच ओळख मिळाली. झहीर खान आणि त्याच्या डेटिंगची अफवा खूप चर्चेत होती. यानंतर दोघेही युवराज सिंगच्या लग्नात दिसले. त्यानंतर 2017 मध्ये झहीरने सागरिकासोबत लग्न केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.