Goa Sports News धीरजने बजावली उल्लेखनीय कामगिरी .
Goa Sports News धीरजने बजावली उल्लेखनीय कामगिरी . Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाचा धीरज एएफसी लीग संघात..!

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवाचा (Goa Sports) प्रमख गोलरक्षक धीरज सिंग याला आशियाई फुटबॉल (Football) महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग मोसमातील सर्वोत्तम खेळाडूंत स्थान मिळाले आहे. हा मान मिळविणारा तो पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला.

एएफसी चँपियन्स लीग मोसमातील सर्वोत्तम संघाची घोषणा करण्यात आली असून त्यात धीरजला स्थान मिळाले आहे. या वर्षी एप्रिलमध्ये गोव्यात झालेल्या एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटात एफसी गोवा संघ खेळला होता. त्यावेळी धीरजने उल्लेखनीय कामगिरी बजावली. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय क्लब हा मान एफसी गोवा संघाला मिळाला होता.

भारतात 2017 साली झालेल्या 17 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत धीरज भारतीय संघाचा मुख्य गोलरक्षक होता.

2020 - 21 मोसमाच्या मध्यास (जानेवारी 2021 ) तो एटीके मोहन बागान संघातून एफसी गोवा संघात दाखल झाला, त्यानंतर माजी आयएसएल लीग विनर्स शिल्ड संघाचा तो प्रमुख गोलरक्षक ठरला. 2021- 22 मोसमासाठी प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी धीरजलाच पहिली पसंती दिली आहे.

चमकदार कामगिरी

एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेच्या गटसाखळीत एफसी गोवाने सहापैकी तीन सामने बरोबरीत राखले. त्यात दोन लढतीत त्यांनी एकही गोल स्वीकारला नाही. यावेळी धीरज संघाचा गोलरक्षक होता. त्याने त्या स्पर्धेत 86 . 2 टक्केवारीसह 26 फटके अडविले, त्यात एका पेनल्टी फटक्याचाही समावेश होता. धीरज मूळ मणिपूरचा असून सध्या 21 वर्षांचा आहे. भारतीय सीनियर संघातून त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Imran Khan Comeback: इम्रान खान नऊ वर्षांनंतर करणार कमबॅक, गोव्यात शूटिंग सुरू; आमिरचा कॅमिओ

Sattari Farmer : काजूला २५० रु. आधारभूत किंमत द्या : सत्तरीतील बागायतदार

Goa Today's Live News Update: ताळगाव ग्रामपंचायत निवडणूक, मोन्सेरात पॅनल विजयी

Gram Panchayat Karapur : कारापूर-सर्वण ग्रामपंचायत पर्यायी जागेच्या शोधात

नागरिकांची हत्या, मीडियावर बंदी… 'या' मुस्लिमबहुल देशात लष्कर अराजकता का निर्माण करतयं?

SCROLL FOR NEXT