Yash Shooting Academy Dainik Gomantak
क्रीडा

National Sports Competition In Goa: नेमबाजी स्पर्धा गोव्यातच होणार; स्पर्धा संचालकांचाही 'यश शूटिंग अकादमी'ला हिरवा कंदील

यश शूटिंग अकादमीच्या मांद्रे, पेडणे येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

गोव्यात आंतरराष्ट्रीय नेमबाजी सुविधांचा अभाव असल्याचे कारण देत ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील उपरोक्‍त क्रीडा प्रकारास दिल्लीत नेण्याचे घाटत होते.

परंतु, राज्यातील नेमबाजीत सातत्याने कार्यरत असलेल्या यश शूटिंग अकादमीच्या मांद्रे व पेडणे येथील सुविधांवर नेमबाजी स्पर्धा संचालक (डीओसी) यांनी समाधान व्यक्त करत हिरवा कंदील दाखविला आहे.

तसेच राज्याच्या क्रीडा सचिवांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. परिणामी गोव्‍यात नेमबाजी स्‍पर्धा होण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही सुविधा उपलब्ध असल्यास नेमबाजी स्पर्धा गोव्यातच व्हावी असे वाटत आहे. त्यामुळे नेमबाजी स्पर्धा इतर ४० खेळांसह गोव्यातच होणाचे जवळपास निश्चित मानले जाते.

फक्त गोल्फ आणि सायकलिंग (ट्रॅक रेस) हे क्रीडा प्रकारच राज्यात सुविधा नसल्यामुळे दिल्लीत होणार हे स्पष्ट आहे. ११ जुलै रोजी तयार करण्यात आलेल्या स्पर्धा मसुद्यानुसार, नेमबाजी स्पर्धा नवी दिल्लीतील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवर घेण्याचे ठरले होते. गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत एकूण ४३ खेळांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, मांद्रे येथील यश शूटिंग अकादमीच्या साधनसुविधांवर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे (एनआरएआय) संयुक्त सचिव पवनकुमार सिंग यांनी समाधान व्यक्त करताना प्रशंसाही केली आहे. तसा अहवाल त्यांनी दिलेला आहे.

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे नेमबाजी ‘डीओसी’ ॲड. मेघःश्याम भांगले यांनी १८ ऑगस्ट रोजी मांद्रे व पेडणे येथील नेमबाजी सुविधांची पाहणी करून २० ऑगस्ट रोजी अहवाल सादर केला.

त्यावर बांबोळी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन बैठकीत सविस्तर चर्चाही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपलब्धतेनुसार २५ अथवा २६ ऑक्टोबरला गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन होईल.

नेमबाजी सुविधा निर्मितीचा उद्देश

यश शूटिंग अकादमीचे योगेश पाडलोसकर यांनी कोणत्याही सरकारी मदतीविना यश शूटिंग हबची निर्मिती केली आहे. ‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद गोवा भूषवत आहे आणि नेमबाजी स्पर्धा गोव्यातच व्हावी असे मला वाटते, कारण गोव्यात नेमबाजी केंद्र उपलब्ध आहे.

गोवा सरकारने पुढाकार घ्यावा आणि कामाच्या पूर्ततेसाठी यश शूटिंग अकादमीला मदत करावी. संबंधित राज्यात क्रीडा सुविधा विकसित होणे हा राष्ट्रीय स्पर्धा घेण्यामागचा मुख्य उद्देश आहे,’’ असे ‘डीओसी’ ॲड. मेघःश्याम भांगले यांनी अहवालात म्हटले आहे.

पेडणे येथील काम युद्धपातळीवर

‘डीओसी’ ॲड. भांगले यांनी अहवालात नमूद केल्यानुसार, यश शूटिंग अकादमीच्या पेडणे येथील रेल्वे स्थानकाजवळील शॉटगन रेंजचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या ठिकाणी ट्रॅप आणि स्कीट नेमबाजीसाठी दोन रेंज असतील.

रेंजचे काम १५-२० दिवसांत पूर्ण होईल. या ठिकाणी वातानुकूलित कंटनेर्स आणि तंबू उभारण्याचे आश्वासन अकादमीचे अध्यक्ष योगेश पाडलोसकर यांनी दिले आहे. शिवाय भोजनव्यवस्थाप, अतिमहनीय व्यक्ती, तांत्रिक अधिकारी आसनव्यवस्था, राष्ट्रीय महासंघाचासाठी कार्यालय यांचीही व्यवस्था केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT