ISRO: ''...अन्यथा राहण्यासाठी मानवाकडे दुसरा पर्यायच नाही'', का म्हणाले इस्त्रोचे उपसंचालक? जाणून घ्या...

दुसरा पर्यायच नाही : इस्त्रोचे उपसंचालक डॉ. व्ही. गिरीश यांचे व्‍याख्‍यान
ISRO
ISRODainik Gomantak
Published on
Updated on

ISRO जर मानवाला पृथ्वी सोडून अवकाशातील इतर कुठल्या तरी जागी रहावे लागले तर योग्य ठिकाण कोणते, असा प्रश्‍‍न विचारला गेला तर पृथ्वी हेच मानवासाठी योग्य ठिकाण आहे.

पृथ्वीशिवाय मानवाला राहण्यासाठी दुसरा पर्यायच नाही, असे मत इस्त्रोचे उपसंचालक डॉ. व्ही. गिरीश यांनी व्‍यक्त केले.

काल शनिवारी मराठी विज्ञान परिषदेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘पृथ्वीशिवाय इतर कुठे संभाव्य मानवी अधिवासासाठी विश्र्वाचा शोध’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.

डॉ. व्ही. गिरीश एरवी स्वत: मडगावात येऊन व्याख्यान देणार होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इस्त्रोला आकस्मिक भेट ठरल्‍याने त्यांनी आपले व्याख्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रस्तुत केले.

या व्याख्यानाला मडगाव व परिसरातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयांतील विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी डॉ. व्ही. गिरीश यांनी माणसासाठी गरजेचे असलेला प्राणवायू (ऑक्सिजन), पाणी, तापमान व दबाव याचे महत्त्‍व पटवून दिले.

बुध हा पृथ्वीला जवळचा ग्रह आहे. पण आमचे २९ दिवस म्हणजे तिथे एक दिवस व आमच्या २९ रात्री म्हणजे तिथे एक रात्र. सूर्य तिथे सलग २९ दिवस प्रकाश देतो, तर २९ दिवस दिसतच नाही. त्यामुळे तेथे जास्तीत जास्त अधिक ८०० डिग्री व कमीत कमी वजा २०० डिग्री सेल्सियस तापमान असते.

साहजिकच मानव तिथेही राहू शकणार नाही. शुक्रावर तर सर्वांत जास्त तापमान म्हणजे ४५२ डिग्री सेल्सियस एवढे असते. नेपच्यून ग्रहावरही मानव जाऊ शकत नाही, कारण तिथे १९०० प्रतितास या वेगाने वारा वाहत असतो.

त्यामुळे पृथ्वीशिवाय मानवाला राहण्यासाठी दुसरी योग्य जागा नाही. म्हणूनच पृथ्वीवरील निसर्गाचा समतोल राखला पाहिजे, असे सांगून डॉ. व्‍ही. गिरीश यांनी व्याख्यानाची समाप्ती केली.

ISRO
‘पाडेली’ मिळेनात, अन्‌ नारळ पडेनात!

ब्रह्मांडात कोट्यवधी आकाशगंगा, तारकामंडळे आहेत. आमची आकाशगंगा सोडून आम्‍हाला दुसऱ्या आकाशगंगेत जाता येणार नाही.

कारण ती इतकी दूर आहे की तिथे पोहोचण्यासाठीच आम्हाला हजारो वर्षे लागतील. त्यामुळे आमच्या सूर्यमालेत जे इतर ग्रह आहेत त्‍यांचाच विचार करावा लागेल, पण तेथेही मनुष्‍याला राहणे सध्‍या तरी शक्‍य नाही.

- डॉ. व्ही. गिरीश, उपसंचालक

ISRO
Vishwajit Rane: सत्तरीत 22 कोटींचे रस्ते केले; आता शिक्षण, आरोग्य सारख्या पायाभूत सुविधांसाठी मी कटिबद्ध

...तर भविष्‍यात मंगळावर लोकवस्‍ती

मंगळ ग्रह पृथ्वीप्रमाणेच आहे. मंगळाचा परिभ्रमणाचा काळ व ऋतू वगैरेत साम्य आहे. तेथे मानव राहू शकतो, पण तेथे जास्त प्रमाणात सौर वारा वाहत असतो व फ्लेअर्समधून येणारे विकिरण त्रासदायक ठरू शकतात.

याच्या उलट पृथ्वीवर चुंबकीय क्षेत्र असल्यामुळे विकिरणांपासून त्याचे संरक्षण होत असते. तिथे इथल्याप्रमाणे चुंबकीय क्षेत्र किंवा वातावरण नाही. शिवाय तेथे जास्तीत जास्त धूळ आहे.

जर मानवाने भविष्यात मंगळावरील हे प्रश्न सोडविण्यात यश मिळवले तर कदाचित तो तिथे राहू शकेल, असेही डॉ. व्ही गिरीश यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com