Amey Awadi Dainik Gomantak
क्रीडा

Slovakia Open Piestany 2023: गोव्याचा बुद्धिबळपटू अमेय अवदीला स्लोव्हाकियात ‘पोडियम’

अमेयने स्लोव्हाकियातील स्पर्धेत नऊ फेऱ्यांतून सहा गुण प्राप्त केले.

गोमन्तक डिजिटल टीम

किशोर पेटकर

Slovakia Open Piestany 2023 गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी याने परदेशातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार खेळाची मालिका कायम राखताना स्लोव्हाकियात ‘पोडियम फिनिश’ मिळविले. पिएस्तानी खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या अ गटात त्याने सहावा क्रमांक पटकावून छाप पाडली.

मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या अमेयला सतरावे मानांकन होते. अखेरीस त्याने पहिल्या दहा खेळाडूंत स्थान मिळविण्याची किमया साधली. स्पर्धेत 21 देशांतील 74 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. जुलै महिन्याच्या सुरवातीस त्याने चेक प्रजासत्ताकात झालेल्या चेस्के बुदोएविच खुल्या अ गट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.

प्रभावी रेटिंग कामगिरी

अमेयने स्लोव्हाकियातील स्पर्धेत नऊ फेऱ्यांतून सहा गुण प्राप्त केले. त्याने चार डाव जिंकले, तर चार डाव बरोबरीत राखले. या स्पर्धेतील कामगिरीने अमेयला 2526 गुणांचे रेटिंग मिळाले, तसेच फिडे मानांकनात १६.५ गुणांचा फायदाही झाला.

स्पर्धेतील लक्षवेधक कामगिरी

अमेयने स्पर्धेत पोलंडचा आयएम याकुब कोसाकोवस्की, स्लोव्हाकियन फिडे मास्टर गाबुर फार्कुस, भारताचा एआयएम वेदांत नागरकट्टे, भारतीय वूमन इंटरनॅशनल मास्टर रक्षिता रवी यांना नमविले, तर क्रोएशियन ग्रँडमास्टर लिऑन लिव्हेक, हंगेरियन ग्रँडमास्टर गेर्गेली ॲक्गेल, स्लोव्हाकियन आयएम शाहिदी समीर, मंगोलियन फिडे मास्टर आनंद बात्सुख यांना बरोबरीत रोखले.

स्पर्धेतील अंतिमपूर्व डावापर्यंत अमेय अपराजित कामगिरीसह विजेतेपदासाठी दावेदार होता. मात्र अखेरच्या डावात स्लोव्हाकियन ग्रँडमास्टर पेकाच एर्गुस याच्याविरुद्ध पराभूत झाल्यामुळे अमेय सहाव्या स्थानी घसरला. पेकाच व पोलंडचा आयएम याकुब यांचे समान सात गुण झाले, मात्र टायब्रेकर गुणांंनंतर याकुब विजेता ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa To Indore Flight: खुशखबर! गोवा ते इंदूर विमानसेवा 26 ऑक्टोबरपासून सुरू; दिल्लीतून आणखीन 3 विमाने येणार

Anmod Ghat: 'अनमोड'बाबत मोठी अपडेट! महामार्गाच्या विस्ताराला ‘पर्यावरणा’ची स्थगिती; प्रस्तावात त्रुटी असल्याचा दावा

Mapusa Theft: ‘आवाज केला तर ठार मारू’! म्हापशातील चोरीने गोवा हादरला; चोरांनी चहा पिला, फळे खाल्ली, टॅक्सीने गाठले कर्नाटक; वाचा घटनाक्रम..

दुसऱ्या महायुद्धामुळे व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी हुकूमशहा हिटलरला लिहली होती दोन पत्रं; काय लिहलं होतं पत्रात? वाचा

Battle of Longewala: 1971 चा रणसंग्राम; एका रात्रीत पाकिस्तानच्या 36 रणगाड्यांचा खात्मा! काय आहे 'लोंगेवाला युद्धा'ची कहाणी?

SCROLL FOR NEXT