Swimmer Sanjana (Goa) Dainik Gomantak
क्रीडा

संजनाची विजयी मालिका कायम

संजनाचे स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे रौप्य, तर एकंदरीत तिसरे पदक

Dainik Gomantak

Goa: राष्ट्रीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेत (Swimming Tournament) गोव्याची गुणवान जलतरणपटू संजना प्रभुगावकर (Swimmer Sanjana Prabhugaonkar) हिने पदकविजेती कामगिरी शुक्रवारीही कायम राखली. स्पर्धेतील वैयक्तिक दुसरे रौप्य, तर एकंदरीत तिसरे पदक तिने पटकाविले.

राष्ट्रीय जलतरण स्पर्धा बंगळूर येथे सुरू आहे. पर्वरी येथील आर्डी स्कूलमध्ये नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या संजनाने शुक्रवारी मुलींच्या गट एकमधील 100 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. संजनाने शर्यत 1 मिनिट 08.48 सेकंद वेळेत पूर्ण केली. कर्नाटकच्या निना व्यंकटेश (1 मिनिट 06.65 सेकंद) हिला सुवर्णपदक मिळाले, तर महाराष्ट्राच्या पलक धामी (1 मिनिट 08.81 सेकंद) हिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले.

संजनाने स्पर्धेत यापूर्वी 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये 2 मिनिटे 28.71 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 50 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये तिने 31.63 सेकंद वेळेसह रौप्यपदकाची कमाई केली. संजनाने आतापर्यंत स्पर्धेत एक सुवर्ण व दोन रौप्यपदके जिंकली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dabolim Dubai Flight: दाबोळी-दुबई विमानसेवा पुन्हा सुरू होणार, दररोज एक उड्डाण; मुंबई-गोवा मार्गावरही दिवसाला 8 फेऱ्या

Goa Tourist Death: आठ महिन्यांत गोव्यात 56 पर्यटकांचा मृत्यू! 4 पर्यटकांचे खून; 14 जणांचा बुडून मृत्यू, तर 10 जणांची आत्महत्या

DJ चा आवाज, लग्नाचा जल्लोष अन् अचानक आगीचे भयानक लोट! रिसेप्शन पार्टीत 22 जणांचा होरपळून मृत्यू, थरकाप उडवणारा Watch Video

Goa Politics: '2027 मध्ये 30 आमदार निवडून आणू'; वाढदिवसानिमित्त दामू नाईकांचा निर्धार

College Student Election: विद्यार्थी निवडणुकांत सरकारी हस्तक्षेप? NSUIचा गंभीर आरोप; कुमार गवळी म्हणाले, 'दबाव आणला जातोय'

SCROLL FOR NEXT