भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना पुढच्या वर्षी होणार!

दोन्ही संघातील रद्द झालेला सामना आता एजबॅस्टन येथे पुढच्या वर्षी 1 ते 5 जुलै दरम्यान खेळविण्यात येणार आहे.
India vs England
India vs EnglandDainik Gomantak
Published on
Updated on

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यातील पाचवी कसोटी (Fifth Test) वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली होती, आता मात्र ही टेस्ट पुढच्या वर्षी होणार असे ICC ने शुक्रवारी जाहीर केले. (India vs England fifth Test to be held next year) दोन्ही संघातील रद्द झालेला सामना आता एजबॅस्टन येथे पुढच्या वर्षी 1 ते 5 जुलै दरम्यान खेळविण्यात येणार आहे. हा सामना आता पुढच्या वर्षी म्हणजे जुलै 2022 मध्ये बर्मिंघमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळला जाईल. एवढेच नाही तर कसोटी मालिकेचा निकाल देखील या सामन्यानंतरच ठरवला जाईल. पहिल्या चार सामन्यांमध्ये दोन विजयानंतर, भारतीय संघ मालिकेत 2-1 ने पुढे आहे. ECB ने शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी यासंबंधीची माहिती देत एक निवेदन जारी केले. ही मालिका आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. इंग्लंडने ओव्हलवर आयोजित केलेल्या या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाने विजयासह मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या कसोटी सामन्यादरम्यान, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांचे इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाली. यानंतर, शेवटची कसोटी 10 सप्टेंबरपासून मँचेस्टरमध्ये सुरु होणार होती, परंतु त्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाच्या कनिष्ठ फिजिओलाही संसर्ग झाला अन् त्यानंतर सामन्याच्या दोन तास आधीच पाचवा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

India vs England
'आम्ही टीम इंडियाला नक्की पराभूत करु': बाबर आझम

भारत विरुद्ध इंग्लंड वेळापत्रक पुढीलप्रमाणे

  • पाचवी टेस्ट: जुलै 1 ते जुलै 5

  • पहिली टी 20- जुलै 7

  • दुसरी टी 20- जुलै 9

  • तिसरी टी 20- जुलै 10

  • पहिली वन डे - जुलै 12

  • दुसरी वन डे- जुलै 14

  • तिसरी वन डे- जुलै 17

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com