Goa: संजना (जलतरणपटू)  Dainik Gomantak
क्रीडा

संजनाला राष्ट्रीय जलतरणात आणखी एक पदक

राष्ट्रीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेत सांजनाला रौप्य पदक

Dainik Gomantak

Goa: गोव्याची युवा जलतरणपटू संजना प्रभुगावकर (Swimmer Sanjana Prabhugaonkar) हिने राष्ट्रीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेत (National Sub-Junior-Junior Swimming Championship) गुरुवारी आणखी एक पदक जिंकले (Won Medal). मुलींच्या गट एकमधील 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत (Backstroke race) तिने रौप्यपदकाची (Silver medal) कमाई केली. स्पर्धा बंगळूर (Bangalore) येथे सुरू आहे.

संजनाने काल २०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. ५० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत दुसऱ्या स्थानी राहिलेल्या संजनाने ३१.६३ सेकंद वेळ नोंदविली. कर्नाटकाच्या निना व्यंकटेश हिने ३०.८० सेकंद वेळेस सुवर्णपदक जिंकले, तर महाराष्ट्राच्या भक्ती वाडकर हिने ३१.९४ सेकंद वेळेसह ब्राँझपदक मिळविले.

संजना पर्वरी येथील द आर्डी स्कूलची नवव्या इयत्तेतील विद्यार्थिनी आहे. सध्या ती बंगळूर येथील गॅफ्रे ॲक्वेटिक सेंटरमध्ये जलतरण प्रशिक्षक भूषण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण वेळ सराव करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT