भरपाई वेळेतील गोलमुळे सेझा अकादमीस गुण

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये साळगावकरला 1-1 गोलबरोबरीत रोखले
साळगावकर एफसीचे आक्रमण रोखण्याच्या प्रयत्नात सेझा अकादमी संघातील खेळाडू.
साळगावकर एफसीचे आक्रमण रोखण्याच्या प्रयत्नात सेझा अकादमी संघातील खेळाडू.Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: सामन्याच्या भरपाई वेळेतील पाचव्या मिनिटास गोल नोंदवत सेझा फुटबॉल अकादमीने (Sesa Football Academy) गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल (Goa Professional football League) स्पर्धेतील पहिल्या गुणाची कमाई केली. त्यांनी माजी विजेत्या साळगावकर एफसीला (Salgaonkar FC) 1-1गोलबरोबरीत रोखले.

साळगावकर एफसीचे आक्रमण रोखण्याच्या प्रयत्नात सेझा अकादमी संघातील खेळाडू.
Man U, Formula 1 आता आयपीएलच्या मैदानात

सामना गुरुवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. ९०+५व्या मिनिटास विष्णू गोसावी याने नोंदविलेल्या गोलमुळे सेझा अकादमीला पराभव टाळता आला. गतमोसमात त्यांना स्पर्धेत तळाचे स्थान मिळाले होते, यंदा स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत त्यांनी गुण प्राप्त केला. साईश हळर्णकर याने ६६व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे साळगावकर एफसी संघ निर्धारित वेळेत आघाडीवर होता.

सेझा अकादमीतील युवा खेळाडूंनी आज चमकदार खेळ केला, विशेषतः त्यांनी धारदार आक्रमणावर भर दिला. त्यामुळे साळगावकर संघाच्या बचावफळीत खूपच दक्ष राहावे लागले. सामन्याच्या पूर्वार्धात सेझा अकादमीच्या रिझबॉन फर्नांडिसला दोन वेळा गोलने हुलकावणी दिली. त्यापैकी एक प्रयत्न साळगावकरचा गोलरक्षक जेसन डिमेलो याने विफल ठरविला. सामन्याच्या २६व्या मिनिटास सिद्धार्थ कुंडईकर याचा ताकदवान फ्रीकिक फटका सेझा अकादमीचा गोलरक्षक रोनाल गांवकार याने वेळीच रोखल्यामुळे साळगावकरची संधी वाया गेली.

तासाभराच्या खेळानंतर साळगावकरने गोलखाते उघडले. उमंग गायकवाड याने दिलेल्या पासवर साईशचा फटका सेझा अकादमीच्या खेळाडूस आपटून नेटमध्ये घुसला. साळगावकर क्लब विजयाच्या जल्लोषात असताना सेझा अकादमीने बरोबरी साधली. बदली खेळाडू महंमद फहीझ याच्या शानदार क्रॉस पासवर विष्णूने अचूक लक्ष्य साधले.

साळगावकर एफसीचे आक्रमण रोखण्याच्या प्रयत्नात सेझा अकादमी संघातील खेळाडू.
विनय तेंडुलकरांना बुद्धिबळात दणका

चर्चिल ब्रदर्स-मनोरा सामना आज

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत शुक्रवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्ससमोर यूथ क्लब मनोरा संघाचे आव्हान असेल. अगोदरच्या लढतीत मनोरा संघाने कळंगुट असोसिएशनला नमवून तीन गुणांची कमाई केली होती. चर्चिल ब्रदर्सला धेंपो क्लबने गोलशून्य बरोबरीत रोखल्यामुळे एका गुणावर समाधान मानावे लागले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com