Goa Pro League Dainik Gomantak News
क्रीडा

साळगावकर संघ धेंपो क्लबवर भारी

सामन्याच्या भरपाई वेळेत अंतुशचा निर्णायक गोल

Dainik Gomantak

Goa Pro League: सामन्याच्या भरपाई वेळेस अंतुश मोनिझ याने केलेल्या गोलच्या बळावर राज्यस्तरीय पारंपरिक डर्बीत साळगावकर एफसी संघ भारी ठरला. गोवा प्रोफेशनल लीग (Goa Pro League) फुटबॉल स्पर्धेत (Football Tournament) त्यांनी धेंपो स्पोर्टस क्लबला मंगळवारी 1-0 फरकाने हरविले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेला सामना तुल्यबळ ठरला. लढत गोलशून्य बरोबरीत सुटण्याची चिन्हे असताना भरपाई वेळेतील पहिल्याच मिनिटास अंतुशचा नेम अचूक ठरला. डॅरील कॉस्ताने मैदानाच्या उजव्या बाजूतून दिलेल्या पासवर अंतुशने उजव्या पायाच्या सणसणीत फटक्यावर धेंपो क्लबचा गोलरक्षक डायलन डिसिल्वा याला चकवा दिला.

सामन्याच्या १७व्या मिनिटास साळगावकरच्या रिभव सरदेसाई याचा फटका धेंपो क्लबचा गोलरक्षक डायलन याने अडविल्यानंतर, २१व्या मिनिटास धेंपोच्या डॅरेल मस्कारेन्हासचा नेम चुकला. पूर्वार्धातील खेळात धेंपो क्लबच्या व्हिएरी कुलासो याच्या धारदार खेळामुळे साळगावकर एफसीच्या बचावफळीस खूपच दक्ष राहावे लागले.

उत्तरार्धातही संधी गमावण्याची मालिका कायम राहिली. ५७व्या मिनिटास साळगावकरच्या डॅरील कॉस्ताचा प्रयत्न अगदी थोडक्यात हुकला. भरपाई वेळेत साळगावकरने आघाडी घेतल्यानंतर लगेच धेंपो क्लबला बरोबरीची नामी संधी होती, परंतु शालम पिरीस याच्या हेडिंगवर चेंडू गोलपट्टीस आपटल्याने दिशाहीन ठरला.

साळगावकर संघ अपराजित

साळगावकर एफसीचा हा सलग दुसरा विजय ठरला. अपराजित कामगिरीसह त्यांनी तीन लढतीतून सात गुणांची कमाई केली आहे. धेंपो क्लबला पहिलाच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे तीन लढतीनंतर चार गुण कायम राहिले.

चर्चिल ब्रदर्सला पणजी फुटबॉलर्सचे आव्हान

स्पर्धेत बुधवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्ससमोर पणजी फुटबॉलर्सचे आव्हान असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT