'देव तुमचे नशीब ठरवतो' म्हणत युवराज सिंगचे मैदानावर पुनरागमनाचे संकेत

जून 2019 मध्ये, भारताचा स्टार ऑलराउंडर युवराज सिंगने (Yuvraj Singh) पत्रकार परिषदे घेत आंतरराष्ट्रीय खेळातून आपली निवृत्ती जाहीर केली होती
Yuvraj Singh's  Instagram post viral Which indicate his come back in cricket
Yuvraj Singh's Instagram post viral Which indicate his come back in cricket Dainik Gomantak
Published on
Updated on

जून 2019 मध्ये, भारताचा स्टार ऑलराउंडर युवराज सिंगने (Yuvraj Singh) पत्रकार परिषदे घेत आंतरराष्ट्रीय खेळातून (International Cricket) आपली निवृत्ती जाहीर केली आणि भारतसह भारताबाहेरील देखील आपल्या चाहत्यांना धक्का दिला. (Yuvraj Singh's Instagram post viral Which indicate his come back in cricket)

युवराज सिंग त्यावेळी संघात डाव्या हाताचा फलंदाज (Left Arm Batsman) होता ज्याने जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक म्हणून आपले स्थान निर्माण केले होते, तो संघात असो अथवा नसो त्याच्या मागे त्याच्या सर्वोत्तम खेळाचा इतिहास होता, अनेकांचा असा विश्वास होता की युवराज अजूनही खेळू शकेल. त्यावेळी आणखी एक मालिका युवराज खेळेल आणि मग आपली निवृत्ती घोषित करेल असच साऱ्यांना वाटलं होतं. पण दुर्दैवाने युवराज पुन्हा भारताच्या निळ्या जर्सीत चाहत्यांना पाहायला मिळालाच नाही आणि त्यानंतर लगेचच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधूनही आपली निवृत्ती जाहीर केली.

Yuvraj Singh's  Instagram post viral Which indicate his come back in cricket
बुमराह ने दिले T-20 World Cup मध्ये होणाऱ्या पराभवांचे मुख्य कारण

नंतर पुढे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) परवानगी मिळाल्यानंतर भारताच्या या हार्ड हिट फलंदाजाने जगभरातील T-20 लीगमध्ये भाग घेतला आणि यावर्षी रोड सेफ्टी टी-20 मालिकेतही त्याने आपले उत्तम फलंदाजीचे कौशल्य दाखवले.

मात्र आता युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.कारण आपल्या इंस्टाग्राम पोस्टवर त्याने असे संकेत देत साऱ्यांनाच सुखदः धक्का दिला आहे. या पोस्ट मध्ये युवराजने तो फेब्रुवारीमध्ये क्रिकेट जगतात परत येत असल्याचे संकेत दिले आहेत.

या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये त्याने "देव तुमचे नशीब ठरवतो !! सर्व चाहत्यांच्या इच्छा आणि मागणीनुसार मी फेब्रुवारीमध्ये पुन्हा खेळपट्टीवर येईन! अशी भावना आहे !त्यासाठी तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद आणि आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत! मला असेच समर्थन करत रहा ही आपली टीम आहे आणि एक खरा चाहता कठीण काळात आपला पाठिंबा नक्की दर्शवेल,” असे सांगत युवराजने आपल्या पुनरागमनचे संकेत दिले आहेत.

पण आता युवराज भारतासाठी किंवा T-20 लीगमध्ये खेळण्यासाठी परतणार आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसले तरी, क्रिकेटच्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्टार फलंदाजाला पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे हे मात्र नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com