Goa Ranji Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याची पुन्हा कचखाऊ फलंदाजी; सलग दुसरा पराभव

दैनिक गोमन्तक

पणजी : रणजी करंडक क्रिकेट (Cricket) स्पर्धेतील गोव्याची दुसऱ्या डावात कचखाऊ फलंदाजीची मालिका रविवारीही कायम राहिली. त्यामुळे सौराष्ट्रला 211 धावांनी दणदणीत विजय नोंदविता आला, पण एलिट ड गटातील आणखी एका लढतीत मुंबईने ओडिशाला (Odisha) डावाने हरविल्यामुळे गतविजेत्यांना दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या लढतीत गोव्याचा (goa) दुसरा डाव 34.2 षटकांत 130 धावांत संपुष्टात आला. त्यापूर्वी सौराष्ट्रने पहिल्या डावातील 36 धावांच्या आघाडीसह दुसरा डाव कालच्याच 3 बाद 305 धावांवर घोषित करून गोव्यासमोर 342 धावांचे आव्हान ठेवले होते. अगोदरच्या लढतीत मुंबईविरुद्ध गोव्याचा दुसरा डाव 112 धावांत आटोपला होता, यावेळेस थोड्या धावा वाढल्या इतकेच समाधान संघाला लाभले.

एकंदरीत गोव्याचा हा सलग दुसरा पराभव ठरला. मुंबईने (Mumbai) एलिट ड गटात सर्वाधिक 16 गुणांसह अव्वल क्रमांक मिळविला. ते उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. सौराष्ट्रचे 14 गुण झाले, तर ओडिशाच्या खाती तीन गुण जमा झाले. गटात गोव्याचा संघ फक्त एका गुणासह तळात राहिला.

गोव्याच्या दुसऱ्या डावाला सुरुंग लावताना डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन साकारिया याने सहा गडी टिपले, तर डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मेंद्रसिंह जडेजा याने चौघांना बाद केले. सलामीचा अमोघ देसाई (29) व सुयश प्रभुदेसाई (39) यांची दुसऱ्या विकेटची 36 धावांची भागीदारी फुटल्यानंतर गोव्याने ठराविक अंतराने गडी गमावले. पुनरागमन करणारा आदित्य कौशिक, तसेच पाहुणा मुंबईकर शुभम रांजणे यांना भोपळाही फोडता आला नाही, तर पाच डावात 6च्या सरासरीने फक्त 30 धावा केलेल्या अनुभवी दर्शन मिसाळ याला अवघी एकच धाव करता आली.

संक्षिप्त धावफलक

सौराष्ट्र, पहिला डाव ः 437 व दुसरा डाव ः 3 बाद 305 घोषित.

गोवा, पहिला डाव ः 311 व दुसरा डाव ः 34.2 षटकांत 130 (अमोघ देसाई 26, आदित्य कौशिक 0, सुयश प्रभुदेसाई 39, स्नेहल कवठणकर 13, शुभम रांजणे 0, एकनाथ केरकर 11, दर्शन मिसाळ 1, श्रीकांत वाघ 10, लक्षय गर्ग 0, अमित यादव 13, मलिक सिरूर नाबाद 8, चेतन साकारिया 11-4-38-6, धर्मेंद्रसिंह जडेजा 13.2-2-53-4).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT