Goa's International Master Ameya Audi Dainik Gomantak
क्रीडा

Rapid Chess Tournament: गोव्याचा अमेय मलेशियात विजेता; ब्लिट्झ प्रकारातही लक्षवेधक कामगिरी

अमेयने सहा फेऱ्यांतून सर्वाधिक पाच गुण नोंदविले

किशोर पेटकर

Goa's International Master Ameya Audi: गोव्याचा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) बुद्धिबळपटू अमेय अवदी याने मलेशियातील मेर्डेका डे खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी बजावली.

अमेय रॅपिड बुद्धिबळात विजेता ठरला, तर ब्लिट्झ प्रकारात त्याला पाचवा क्रमांक मिळवत बक्षीस मिळविले.

रॅपिड स्पर्धेत अमेयला तृतीय मानांकन होते. त्याने सहा फेऱ्यांतून सर्वाधिक पाच गुण नोंदविले. स्पर्धेत सात देशांतील साठ स्पर्धक सहभागी झाले होते. पाच विजय नोंदविताना त्याने मलेशियन, फिलिपिन्स, इंडोनेशिया देशातील खेळाडूंना हरविले.

ब्लिट्झ स्पर्धेत अमेय १३वा मानांकित होता. त्याने आठ फेऱ्यांतून सहा विजय व एका बरोबरीसह साडेगुण नोंदवून पाचवा क्रमांक प्राप्त केला.

व्हिएतनामचा ग्रँडमास्टर न्गुयेन व्हॅन हुय याच्याविरुद्ध त्याने लाजबाव खेळ करत बरोबरी नोंदविली. ब्लिट्झ प्रकारात १६ देशांतील १४७ खेळाडू सहभागी झाले होते, त्यात ४१ जण मानांकित खेळाडू होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT