सराव करताना हैदराबाद एफसी संघातील खेळाडू Dainik Gomantak
क्रीडा

Goa: हैदराबादला चेन्नईयीनविरुद्ध हॅटट्रिकची संधी

गतमोसमात साखळी फेरीत चेन्नईयीनविरुद्ध हैदराबादने बांबोळी येथे 4-1 फरकाने, तर वास्को येथे 2-0 फरकाने विजय नोंदविला.

दैनिक गोमन्तक

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या गतमोसमात हैदराबाद एफसीने माजी विजेत्या चेन्नईयीन एफसीविरुद्ध दोन्ही सामने जिंकले होते. नव्या मोसमात मंगळवारी (ता. २३) आणखी एक विजय नोंदवून हॅटट्रिक नोंदविण्याचा मानोलो मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघाचा प्रयत्न असेल.

हैदराबाद व चेन्नईयीन एफसी यांच्यातील सामना मंगळवारी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर होईल. स्पॅनिश मार्किझ यांचा हैदराबादचे प्रशिक्षक या नात्याने हा दुसरा मोसम आहे. गतमोसमात सहा विजय, अकरा बरोबरी व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांनी पाचवा क्रमांक मिळविला होता. हैदराबादला उपांत्य फेरी थोडक्यात हुकली होती. बार्थोलोमेव ओगबेचे, हावी सिव्हेरियो, जोएल चियानेज, एदू गार्सिया हे परदेशी, तसेच हालिचरण नरझारी, अनिकेत जाधव, महंमद यासीर यांच्यामुळे हैदराबादचा (Hyderabad) संघ स्थिरावल्यागत वाटतो.

चेन्नईची (Chennai) गतमोसमात कामगिरी लौकिकास साजेशी नव्हती. तीन विजय, अकरा बरोबरी व सहा पराभवासह ते आठव्या क्रमांकावर राहिले होते. दोन वेळचा माजी विजेता संघ यंदा नव्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. माँटेनेग्रोचे 52 वर्षीय प्रशिक्षक बोझिदार बँडोविच यांचा यंदा पहिलाच मोसम आहे. चेन्नईयीन एफसी संघात यंदा नव्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिरुद्ध थापा याच्याकडे चेन्नईयीनचे कर्णधारपद देण्यात आले आहे.

गतमोसमात साखळी फेरीत चेन्नईयीनविरुद्ध हैदराबादने बांबोळी येथे 4-1 फरकाने, तर वास्को येथे 2-0 फरकाने विजय नोंदविला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Nightclubs Goa: गोव्यातील नाईट क्लब, डान्सबार अन् डिस्कोथेक बेकायदेशीर, राज्याच्या कायद्यात तरतूदच नाही; बड्या अधिकाऱ्याच्या खुलाशाने खळबळ

Arpora Nightclub Fire Case: 25 मृत्यूंची गंभीर दखल! हडफडे दुर्घटनाप्रकरणी मानवाधिकार आयोगाची मोठी ॲक्शन; मुख्य सचिव अन् पोलीस महासंचालकांना समन्स

Luthra Brothers Arrested: लुथरा बंधूंच्या अटकेसाठी गृह मंत्रालयाचा मास्टर प्लॅन, पासपोर्ट निलंबित होताच थायलंडमध्ये राहणं झालं मुश्किल

Arpora Nightclub Fire Case: फरार क्लब मालकांचा खेळ खल्लास! लुथरा बंधू लवकरच गोवा पोलिसांच्या ताब्यात; चौकशीत महत्त्‍वपूर्ण माहिती हाती आल्‍याची चर्चा

Horoscope: भाग्याची साथ, कामात यश! 'या' राशींची आज प्रत्येक इच्छा होईल पूर्ण

SCROLL FOR NEXT