National Games Goa 2023
National Games Goa 2023  Dainik Gomantak
क्रीडा

National Games Goa 2023: गोव्याची सर्वोत्तम पदकप्राप्ती; झारखंडमधील 16 पदकांच्या विक्रमाशी बरोबरी

किशोर पेटकर

Goa Has Won 16 Medals In National Games Goa 2023: गोव्याने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या इतिहासात झारखंडमध्ये 2011 साली 34व्या स्पर्धेत एकूण 16 पदके जिंकली होती. आता घरच्या मैदानावर सुरू असलेल्या ३७व्या स्पर्धेत यजमान पदकप्राप्तीत नव्या विक्रमाच्या दिशेने कूच करत आहेत.

गोव्याने शनिवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत एकूण १६ पदके जिंकून आपल्या विक्रमाशी बरोबरी साधली. गोव्याने आतापर्यंत १ सुवर्ण, ४ रौप्य व ११ ब्राँझपदके जिंकली आहेत.

गोव्याने मॉडर्न पेंटॅथलॉन व पेंचाक सिलाटमध्ये प्रत्येकी ७, तर नेटबॉल फास्ट ५ व वेटलिफ्टिंगमध्ये प्रत्येकी १ पदक जिंकले आहेत.

सकाळी मॉडर्न पेटॅथलॉनमधील पुरुषांच्या बायथल प्रकारात गोव्याला सांघिक ब्राँझपदक मिळाले. या संघात युग दळवी, शिवनाथ माजीक व नारायण गिरी यांचा समावेश होता. त्यांनी १६०० मीटर धावणे, २०० मीटर जलतरण आणि पुन्हा १६०० मीटर धावणे तिसऱ्या क्रमांकाने पूर्ण केले.

संध्याकाळी गोव्याच्या युग दळवी व प्रतीक्षा गावकर या मिश्र रिले संघाने बायथल सांघिक प्रकारात आणखी एक ब्राँझपदक जिंकले.

वेटलिफ्टिंगमध्ये गोव्याने राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम साधला. पुरुषांच्या १०२ किलो वजन गटात सेनादला, परंतु गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शुभम वर्मा याने एकूण ३२६ किलो वजन उचलले.

या २९ वर्षीय वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये १४३, तर क्लीन अँड जर्कमध्ये १८३ किलो वजन उचलले. सुवर्णपदक सेनादलाच्या कोजुम ताबा याने जिंकले. त्याने एकूण ३३० किलो (१४८ व १८२) उचलून अव्वल क्रमांक मिळविला. गोव्याच्या शुभमला चार किलोंच्या फरकाने सुवर्णपदक हुकले.

गोव्याच्या पेन्चाक सिलाट खेळात आणखी दोन ब्राँझपदके शनिवारी मिळाली. पुरुषांच्या टॅडिंग प्रकारातील ४५ किलोखालील वजनगटात अजय कोरबोटकर याला, तर महिलांच्या टॅडिंग प्रकारातील ४५-५० किलो वजनगटात परमेश चौहान हिला ब्राँझपदक मिळाले.

नव्या विक्रमाची संधी

गोव्याला हमखास पदके मिळणारे खेळ अजून बाकी आहेत. यामध्ये तायक्वांदो, स्क्वे मार्शल आर्ट, वुशू, बॉक्सिंग, जलतरण, यॉटिंग, फुटबॉल हे खेळ आहेत. त्यामुळे गोवा घरच्या मैदानावर पदकांचा नवा विक्रम सर करू शकेल.

तुलनात्मक

२०११ : ५ सुवर्ण, ५ रौप्य, ६ ब्राँझ, एकूण १६

२०२३ (२८ रोजी ४ वाजेपर्यंत): १ सुवर्ण, ४ रौप्य, ११ ब्राँझ, एकूण १६

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT