National Games Goa 2023: 'पासची गरज नाही', राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सर्वांसाठी खुली

गोवा सरकारच्या क्रीडा विभागाने गुरुवारी याबाबत अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.
National Games Goa 2023
National Games Goa 2023Dainik Gomantak

National Games Goa 2023: गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता सर्वांसाठी खुल्या असणार आहेत. स्पर्धा होत असलेल्या सर्व ठिकाणी कोणतेही पास किंवा परवानगी न घेता प्रवेश दिला जाणार आहे. गोवा सरकारच्या क्रीडा विभागाने गुरुवारी याबाबत अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे.

राज्यात 26 ऑक्टोबरपासून राष्ट्रीय क्रीडा महाकुंभाला सुरुवात झाली आहे, 09 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व ठिकाणी सर्वसामान्यांना प्रवेश दिला जाईल. प्रेक्षक गॅलरीतून नागरिकांना स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे.

'एक अ‍ॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे, स्पर्धेच्या सर्व स्थळांवर सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही पास किंवा परवानगी पत्राशिवाय प्रवेश द्यावा अशी सूचना कमांडंट आणि सुरक्षा प्रभारी यांना देण्यात आली आहे,' अशी माहिती राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी पीटीआयशी बोलताना दिली.

दरम्यान, स्टेडियममध्ये जागा शिल्लक असताना देखील काही ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश नाकारल्याचा प्रकार समोर आला. पण, गावडे यांनी प्रवेशाला परवानगी देण्याची सूचना केल्याचे स्पष्ट केले.

तसेच, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकलेल्या सर्व खेळाडूंना राज्य सरकारच्या योजनेनुसार बक्षिसे दिली जातील, असेही गोविंद गावडे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 26 ऑक्टोबर रोजी जवाहरलाल नेहरू स्टेडियम फातोर्डा येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 चे उद्घाटन करण्यात आले.

गोव्यातील म्हापसा, मडगाव, पणजी, फोंडा आणि वास्को या पाच शहरात सध्या विविध स्पर्धा सुरु आहेत. 28 राज्ये, आठ केंद्रशासित प्रदेश आणि सेवा क्रीडा नियंत्रण मंडळ (SSCB) मधील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. गोवा इतिहासात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com