Goa Women Cricket: Dainik Gomantak
क्रीडा

Goa Women Cricket: गोव्याच्या मुलींचा संघ 23 धावांत आऊट; तामिळनाडूने सहज पार केले आव्हान

15 वर्षांखालील मुलींच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग दुसरा पराभव

किशोर पेटकर

Goa Women Cricket: गोव्याच्या १५ वर्षांखालील मुलींचा क्रिकेट संघ शनिवारी अवघ्या ८ धावांत गारद झाला होता. या नीचांकी धावसंख्येनंतर एकदिवसीय सामन्यांच्या क्रिकेट स्पर्धेत त्यांना रविवारी किमान २०.४ षटके फलंदाजी करून २३ धावांची मजल गाठल्याचे समाधान लाभले.

प्रतिस्पर्धी तमिळनाडूने विजयासाठी २४ धावा फक्त एक विकेट गमावून केवळ ४.५ षटकांतच नोंदविल्या आणि गोव्याच्या महिला क्रिकेटमधील मर्यादा उघड झाल्या.

स्पर्धेच्या ड गटातील सामना हरियानातील झज्जर येथील सेहवाग इंटरनॅशनल स्कूल मैदानावर झाला. बंगालविरुद्ध फक्त ८ धावा केलेल्या गोव्याने तमिळनाडूविरुद्ध दुहेरी धावसंख्या गाठली, परंतु त्यांच्या एकाही बॅटरला दोन अंकी धावा करता आल्या नाहीत.

किमया पाठक हिने सहा धावा केल्या. अतिरिक्त ११ धावा गोव्याच्या डावात सर्वाधिक ठरल्या. सहा जणी शून्यावर बाद झाल्या. एकंदरीत कामगिरीवरून गोवा क्रिकेट असोसिएशनने मुलींच्या क्रिकेटकडे विशेषतः फलंदाजीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः २०.४ षटकांत सर्वबाद २३ (गायत्री गावकर १, कामाक्षी धारवाडकर ०, नंदिनी चौहान ०, दिशा देसाई ०, विधी भांडारे १, दिलेशा डिचोलकर १, किमया पाठक ६, प्रगती भोसले ०, शिल्पा शर्मा नाबाद ३, सान्वी गावस ०, तनिशा वेळीप ०, नंधना श्रीधरन ६-२, पूजाश्री ३-२, के. आसिता १-२)

पराभूत वि. तमिळनाडू ः ४.५ षटकांत १ बाद २४ (के. हशिनी नाबाद ११, तनिशा वेळीप १-०-७-०, विधी भांडारे २-०-७-०, किमया पाठक १.५-०-१०-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT