Establishment of South Goa United Academy (Goa Football) Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football: फुटबॉलच्या विकासासाठी साऊथ गोवा युनायटेड अकादमीची स्थापना

खेळाडुंना अत्याधुनिक सोयीसुविधा तसेच तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे शिस्तबद्ध प्रशिक्षण (Goa Football)

Mangesh Borkar

Fatorda: लुईस बार्रेटो व कॅविन लोबो या गोव्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉलपटूंनी (International level Footballer) राज्यात (Goa State) फुटबॉलच्या सर्वांगीण विकासासाठी साऊथ गोवा युनायटेड अकादमीची (South Goa United Academy) स्थापना केली. आज नुवे (Nuvem) येथे या अकादमीची रितसर स्थापना करण्यात आली. या अकादमीमध्ये सर्वच जण फुटबॉलकडे (Goa Football) अगदी निगडीत असुन टेरेन्स लोबो हे या अकादमीचा अध्यक्ष, लुईस बार्रेटो सचिव, कॅविन लोबो संयुक्त सचिव तर ब्लिंनिका कुलासो खजिनदार आहेत. नुवे येथील एम्पायर स्पोर्टस एरेनामध्ये 50 लाख रुपये खर्चुन एस्ट्रो टर्फ फुटबॉलचे मैदान तयार केले असुन फुटसालसाठीही त्याचा उपयोग होणार आहे. या अकादमीत 6 ते 16 वयोगटातील युवा खेळाडुंना सर्व आधुनिक सोयीसुविधा (Sophisticated amenities) तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा (Modern technology) वापर करुन, शिस्तबद्ध व वैज्ञानिक पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाईल (Disciplined and scientific training). अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक म्हणुन माजी नायजेरियन खेळाडू तसेच प्रशिक्षक क्लिफर्ड चुकवुमा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण जे फुटबॉलमध्ये शिकलो, अनुभवलो त्याची परतफेड करतान युवा खेळडूंना सर्वोत्तम दर्जा प्राप्त करुन देण्यासाठी या अकदमीची स्थापना करण्यात आल्याचे लुईस व कॅविन यांनी सांगितले.

खेळाडूंबरोबरच राज्यातील प्रशिक्षकांनाही (State Coach) प्रशिक्षण दिले जाईल तसेच त्यांना आपले मानांकन वाढविण्यासाठी जे सहकार्य लागेल ते दिले जाईल असे अकादमीचे माजी फुटबॉलपटू बिबियान फर्नांडिस यानी सांगितले. गोवा फुटबॉल असोसिएशनकडील नोंदणी प्रक्रिया पुर्ण झाल्यावर या अकादमीचे संघ विविध वयोगटातील स्पर्धांमध्येही भाग घेतील. भारतात फुटबॉलची (India Football) प्रगती होत आहे. देशातील इतर राज्यांपेक्षाही गोव्यात फुटबॉलचा दर्जा चांगला आहे. अकादमीतील युवा खेळाडुंना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना उच्च स्तरावर नेण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे मुख्य प्रशिक्षक क्लिफर्ड चुकवुमा याने सांगितले. अजुन पर्यंत प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्र्चित केलेला नाही तरी अकादमीमध्ये संपुर्ण गोव्यातील 200 ते 250 खेळडूंना सामावुन घेतले जाईल व आठवड्यांतुन तीन वेळा त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणासाठी 8, 10, 12, 14 व 16 वर्षाखालील मुलांना प्राधान्य दिले जाईल असे चुकवुमा याने सांगितले. अकादमी स्थापना सोहळ्यास लुईस बार्रेटो व कॅविन लोबो व्यतिरिक्त तेरेन्स लोबो, ब्लिनिका कुलासो, विवेक दा वेगा, ज्योकीम आब्रांचीस हे खेळाडु उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: गिल-राहुलचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या भूमीवर रचला नवा इतिहास, मोडला 23 वर्ष जुना रेकॉर्ड

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT