Goa Football: Pro League Dainik Gomantak
क्रीडा

Goa Football: महामारी नियमामुळे सेझा अकादमीस दिलासा

Goa Football: ‘जीएफए’चा आगामी राज्यस्तरीय फुटबॉल मोसम सप्टेंबरपासून

दैनिक गोमंतक

पणजीः कोरोना विषाणू महामारीमुळे (Covid-19) गतमोसमातील फुटबॉलवर मर्यादा आल्या, त्यामुळे सेझा फुटबॉल अकादमीस (Sesa Football Academy) दिलासा मिळाला आहे. गोवा फुटबॉल असोसिएशनने (Goa Football Association) गतमोसमातील प्रो-लीग (Pro-League) स्पर्धेतील पदावनती नियम स्थगित करण्याचे ठरविल्याने या संघाचे स्थान कायम राहिले. जीएफएचा आगामी राज्यस्तरीय मोसम येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होईल. त्या दिवशी वार्षिक मदतनिधी सामना खेळला जाईल. यंदा पोलिस कप स्पर्धा खेळविण्याचे जीएफएचे नियोजन आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा खेळविण्याचे जीएफएने ठरविले आहे. त्यापूर्वी पोलिस कप स्पर्धेचे वेळापत्रक असेल. जीएफएच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत निर्णय झाले.

कोरोना विषाणू महामारीमुळे गतमोसमात संघांना तयारीस पुरेसा वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे गतमोसमातील आय-लीग स्पर्धेत तळास राहिलेल्या नेरोका एफसीची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने पदावनती केली नव्हती. तोच नियम जीएफएने प्रो-लीग स्पर्धेसाठी लागू केला आहे. त्यामुळे 12 संघांत शेवटच्या क्रमांकावर राहिलेल्या सेझा अकादमीचे स्थान कायम राहिले असून त्यांना 2021-22 मोसमात प्रो-लीग स्पर्धेत खेळायला मिळेल. यंदाची प्रो-लीग स्पर्धा गतमोसमाप्रमाणे अजिंक्यपद फेरी आणि पदावनती फेरी या धर्तीवर खेळली जाईल. कोविड-19 मुळे जीएफएची प्रथम विभागीय स्पर्धा 2019-20 व 2020-21 मोसमात रद्द करावी लागली. स्थानिक पातळीवरील ही प्रमुख स्पर्धा, तसेच 20 वर्षांखालील लीग स्पर्धा पुढील वर्षी जानेवारीपासून खेळविण्याचे जीएफएने ठरविले आहे. मोसमातील सर्व स्पर्धा कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजना आणि खेळाडूंच्या लसीकरणावर भर देत खेळविण्यात येतील असे जीएफएच्या व्यवस्थापकीय समिती बैठकीत ठरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

Gomantak TV Engineers Excellence Awards: जिथे प्रश्न, तिथे अभियंत्यांचा 'तोडगा'! गोमन्तक टीव्ही इंजिनिअर्स एक्सलन्स ॲवॉर्डने 11 अभियंत्यांचा गौरव; खांडेपारकरांना जीवनगौरव

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

SCROLL FOR NEXT