Goa Football Association Election Dainik Gomantak
क्रीडा

GFA Election : जीएफए अध्यक्षपदासह उपाध्यक्षपदासाठी चुरस

जीएफए कार्यकारिणी निवडणूक येत्या 30 ऑक्टोबर रोजी पणजीत होईल.

गोमन्तक डिजिटल टीम

GFA Election : गोवा फुटबॉल असोसिएशन (जीएफए) कार्यकारी समितीच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी निवडणूक अधिकारी प्रमोद कामत यांनी सोमवारी जाहीर केली. त्यानुसार, संघटनेचे अध्यक्षपद, तसेच उत्तर आणि दक्षिण उपाध्यक्षपदासाठी जोरदार चुरस आहे. तिसवाडी विभागातील चार जागा बिनविरोध ठरल्या, पण इतर तीन विभागात चढाओढ आहे.

जीएफए कार्यकारिणी निवडणूक येत्या 30 ऑक्टोबर रोजी पणजीत होईल. तिसवाडी विभागातील सदस्यपदाच्या चार जागांवर अनुक्रमे संजीव नागवेकर, मॉरिसियो आल्मेदा, अँथनी फ्रान्सिस वाझ व ॲगी आल्मेदा बिनविरोध ठरले. मात्र कार्यकारी समितीच्या इतर 17 जागांसाठी 34 उमेदवार रिंगणात आहेत.

प्रतिष्ठेच्या लढती

दक्षिण विभागातील एका उपाध्यक्षपदासाठी संघटनेचे प्रभारी अध्यक्ष अँथनी पांगो (स्नोज फुटबॉल अकादमी) व फिलोमेनो कॉस्ता (स्पोर्टिंग क्लब दवर्ली) यांच्यात थेट लढत होईल. उत्तर विभागातील एका उपाध्यक्षपदासाठी तिघे उमेदवार आहेत. यामध्ये डॉमनिक परेरा (यूथ स्पोर्टस क्लब ऑफ कोलवाळ), जोनाथन डिसोझा (एफसी गोवा) आणि व्हिक्टर ग्रेगरी फर्नांडिस (पणजी फुटबॉलर्स) यांचा समावेश आहे. मुरगाव विभागातील सदस्यपदाच्या दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात असल्याने या लढतीकडे लक्ष असेल. या पदासाठी अँड्र्यू अँथनी फेर्राव (कासावली आरोसी कुयेली स्पोर्टस क्लब), फ्रान्सिस जुझे नुनीस (बेनफिका यूथ क्लब) व ॲडलियर डिक्रूझ (साळगावकर एफसी) यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत

अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी चर्चिल ब्रदर्स स्पोर्टस क्लबचे सावियो आलेमाव, गोवा वेल्हा स्पोर्टस क्लबचे वेल्विन मिनेझिस व फुटबॉल क्लब तुयेचे कायतान जुझे फर्नांडिस यांच्यात तिरंगी लढत होईल. निवडणुकीत कायतान यांनी आपले पॅनल उतरविले आहे.

बहुरंगी लढती

बार्देश आणि सासष्टी विभागात बहुरंगी लढती होणार आहेत. बार्देश विभागात सदस्यपदाच्या पाच जागा आहेत, त्यासाठी नऊ उमेदवारांत चढाओढ असेल. सासष्टीत सदस्यपदाच्या सात जागा असून एकूण 14 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT