Goa Football Association Election Dainik Gomantak
क्रीडा

GFA Election : जीएफए अध्यक्षपदासाठी चौरंगी चुरस

फुटबॉल निवडणूक; लेव्हिनो परेरा यांचाही अर्ज, उपाध्यक्षासाठी रस्सीखेच

Kishor Petkar

पणजी : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) कार्यकारी समितीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची मुदत शुक्रवारी संपली. संघटनेच्या सर्वच जागांसाठी जोरदार चढाओढ असून अध्यक्षपदासाठी चौरंगी चुरस असेल. उपाध्यक्षपदासाठीही रस्सीखेच आहे.

जीएफए कार्यकारी समिती निवडणूक येत्या 30 ऑक्टोबर रोजी होईल. समितीच्या 21 जागांसाठी शुक्रवारी दुपारपर्यंत अर्ज स्वीकारण्यात आले. छाननीनंतरची उमेदवारी यादी जीएफए निवडणूक अधिकारी 7 ऑक्टोबर रोजी जाहीर करतील. 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुभा असेल. एकंदरीत जीएफए निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहे. एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व 18 सदस्यपदांसाठी निवडणूक नियोजित आहे.

चर्चिलपुत्रास आव्हान

अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी सहा अर्ज आहेत. माजी अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांचा पुत्र सावियो आलेमाव याच्यासमोर कडवे आव्हान आहे. अध्यक्षपदासाठी एकूण चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत. सावियो आणि माजी सचिव वेल्विन मिनेझिस यांचे प्रत्येकी दोन अर्ज आहेत.

वेल्विन यांचा गोवा वेल्हा स्पोर्टस क्लब व स्पोर्टिंग क्लब द गोवातर्फे अर्ज आहे. एफसी तुये संघाचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला होता. शुक्रवारी सकाळी क्लब सां मिंगेल द ताळगावचे लेव्हिनो अँथनी परेरा यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता एका अध्यक्षपदासाठी चौरंगी चुरस निर्माण झाली आहे.

दक्षिण उपाध्यक्षपदासाठी दोघे

दक्षिण विभागातील एका उपाध्यक्षपदासाठी दोघे मातब्बर उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. एका जागेसाठी एकमत न झाल्यास जीएफएचे अंतरिम अध्यक्ष अँथनी पांगो व पोलिस निरीक्षक फिलोमेनो कॉस्ता या दोघांत रस्सीखेच असेल.

उत्तर उपाध्यक्षपदासाठीही चढाओढ

उत्तर विभागातील एका उपाध्यक्षपदासाठी पाच उमेदवारांचे सहा अर्ज आहेत. फ्रान्सिस झेवियर फर्नांडिस यांचे दोन अर्ज आहेत. याशिवाय डॉमनिक परेरा, जोनाथन डिसोझा, बाबली मांद्रेकर, व्हिक्टर फर्नांडिस यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

मुरगाव विभागाकडे लक्ष

मुरगाव विभागात सदस्यपदासाठी दोन जागा आहेत. त्यासाठी अँड्र्यू फेर्रांव, फ्रान्सिस नुनीस, सध्याचे अंतरिम सचिव ॲडलियर डिक्रूझ यांनी अर्ज दाखल केला आहे. एकाने अर्ज मागे घेतल्यास या विभागातील सदस्य मागीलप्रमाणेच बिनविरोध ठरू शकेल.

इतर विभागात अटीतटीची लढत

सासष्टी, तिसवाडी व बार्देश विभागातील सदस्यपदासाठी अटीतटीची लढत होऊ शकते. सासष्टीतील सात जागांसाठी सर्वाधिक 16 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बार्देशमधील पाच जागांसाठी दहा, तर तिसवाडीतील चार जागांसाठी आठ अर्ज आहेत.

जीएफए निवडणूक दृष्टिक्षेपात

पद जागा अर्ज

  • अध्यक्ष 1 6

  • उपाध्यक्ष (उत्तर) 1 6

  • उपाध्यक्ष (दक्षिण) 1 2

  • सदस्य (मुरगाव) 2 3

  • सदस्य (सासष्टी) 7 16

  • सदस्य (तिसवाडी) 4 8

  • सदस्य (बार्देश) 5 10

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT