Umpire Raja Nagarajan Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच राजा यांचे निधन

‘जीसीए’चे माजी पदाधिकारी : तेंडुलकर, गांगुली, अझर, लक्ष्मण खेळलेल्या सामन्यात पंचगिरी

किशोर पेटकर

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पंचगिरी केलेले पहिले आणि एकमेव गोमंतकीय, ‘राजा’ या नावाने राज्य क्रिकेट वर्तुळात प्रसिद्ध असलेले राजा नागराजन यांचे सोमवारी पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 69 वर्षांचे होते.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) संयुक्त सचिव, तसेच सदस्य या नात्याने राजा यांनी प्रशासकीय योगदान दिले होते. राज्यातील क्रिकेट पंचगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी परिश्रम घेत गोमंतकीयांना मोठ्या प्रमाणात पंचगिरीत आणले होते.

‘‘गुरुवर्य राजा, आपणास या जन्मी कधीच विसरू शकणार नाही. आपल्यामुळेच आज मी पंचगिरीत या ठिकाणी उभा आहे. आपणास शतशः नमन. देव आपल्या आत्म्यास शांती देवो,’’ अशी भावपूर्ण प्रतिक्रिया राजा यांना श्रद्धांजली वाहताना गोव्याचे ज्येष्ठ, अनुभवी क्रिकेट पंच भारत नाईक यांनी व्यक्त केली.

मूळ दाक्षिणात्य, पण गोव्यात सारी हयात घालवलेले राजा हे दोना पावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेतील (एनआयओ) सेवानिवृत्त वैज्ञानिक होते. क्रिकेट पंचगिरीत कारकीर्द बहरत असताना रस्ता अपघातात जखमी झाल्यानंतर त्यांना क्रिकेट मैदानावरून सक्तीची निवृत्ती घ्यावी लागली.

त्यांच्या मागे पुत्र विजय शंकर, सून असा परिवार आहे. राजा यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

कटक येथे आंतरराष्ट्रीय पंचगिरी

9 एप्रिल 1998 रोजी कटक येथील बाराबती स्टेडियमवर भारत व झिंबाब्वे यांच्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात राजा नागराजन यांनी नरेंद्र मेनन यांच्या साथीत पंचगिरी केली होती.

त्यांच्यामुळे गोव्यातील क्रिकेट पंचगिरी प्रथमच आंतरराष्ट्रीय नकाशावर झळकली होती. त्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघातून सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महंमद अझरुद्दीन, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण हे दिग्गज खेळले होते.

अझरुद्दीन (नाबाद १५३) व अजय जडेजा (नाबाद ११६) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली २७५ धावांची अभेद्य भागीदारी तत्कालीन विक्रमी ठरली होती. लक्ष्मणने त्या लढतीत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. भारताने तो सामना 32 धावांनी जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arohi Borde: गोव्याची आरोही बोर्डे चमकली, 68व्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत जिंकले 'गोल्ड'!

Cash For Job Scam: '...सरकारी नोकरी घोटाळ्याला विरोधकही तेवढेच जबाबदार'; 'आयटक' नेते फोन्सेका यांचा हल्लाबोल!

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

SCROLL FOR NEXT