स्नेहल कवठणकर  Dainik Gomantak
क्रीडा

Goa: क्रिकेट संघात नेतृत्वबदल नवा चेहरा एकनाथ केरकरच्या जागी स्नेहल कवठणकर कर्णधार

एकदिवसीय क्रिकेट (Cricket) स्पर्धेतील सफल कामगिरीची या युवा फलंदाजांना बक्षिसी मिळाली आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोव्याच्या क्रिकेट (Cricket) संघात नेतृत्वबदल करण्यात आला आहे. आगामी विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी मध्यफळीतील शैलीदार फलंदाज स्नेहल कवठणकर याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले असून तो T- 20 स्पर्धेत नेतृत्व केलेल्या यष्टिरक्षक-फलंदाज एकनाथ केरकर याची जागा घेईल. गोवा क्रिकेट असोसिएशनने (GCA) बुधवारी 20 सदस्यीय संघ जाहीर केला.

‘टी-20 क्रिकेट स्पर्धेत एकनाथच्या फलंदाजीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. कर्णधार, यष्टिरक्षक व फलंदाज अशी तिहेरी भूमिकेत एकनाथ दबला गेल्याचे जाणवले. त्याने फलंदाजीत अधिकाधिक धावा कराव्यात असे आम्हाला वाटते. या कारणास्तव एकनाथला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचे आम्ही ठरविले. स्नेहलने फलंदाज या नात्याने ठसा उमटविला आहे. स्वभावाने तो शांत आहे, त्यामुळे कर्णधारपदास न्याय देऊ शकेल,’’ असे नेतृत्वबदलाविषयी जीसीए सचिव विपुल फडके यांनी सांगितले.

गोव्याचा नवा कर्णधार स्नेहल कवठणकर 26 वर्षांचा असून त्याने 37 रणजी सामन्यांत 5 शतके व 10 अर्धशतकांसह 2300 धावा, 30 एकदिवसीय सामन्यांत 1 शतक 6 अर्धशतकांसह 943 धावा, 23 टी-20 सामन्यांत 407 धावा केल्या आहेत.

विजय हजारे स्पर्धेत गोव्याचा एलिट ई गटात समावेश आहे. या गटातील सामने झारखंडमधील रांची येथे खेळले जातील. सामने 8 ते 14 डिसेंबर या कालावधीत होतील. आसाम, राजस्थान, सेनादल, रेल्वे, पंजाब हे संघ गोव्याचे प्रतिस्पर्धी आहेत. गोव्याची स्पर्धास्थळी विलगीकरण प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होईल.

दोन नवे चेहरे

संघात मंथन खुटकर व कश्यप बखले हे दोन नवे चेहरे आहेत. 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट (One day cricket) स्पर्धेतील सफल कामगिरीची या युवा फलंदाजांना बक्षिसी मिळाली आहे. कश्यपने 3 डावांत 47 च्या सरासरीने 141 धावा करताना 2 अर्धशतके नोंदविली, तर मंथनने 3 डावात 37 च्या सरासरीने 111 धावा करताना 1 अर्धशतक नोंदविले. सलामीचे ईशान गडेकर व वैभव गोवेकर जायबंदी असल्याने त्यांना संघात स्थान मिळालेले नाही. आजारी असल्याने विशंबर काहलोन टी-20 स्पर्धेत खेळला नव्हता. त्याने पुनरागमन केले असून अमोघ देसाईची संघात निवड झालेली नाही. 25 वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना खेळल्यानंतर सुयश प्रभुदेसाई, मंथन, कश्यप, निहाल सुर्लकर व मोहित रेडकर हे बंगळूर येथून थेट रांची येथे संघात दाखल होतील.

गोव्याचा संघ

स्नेहल कवठणकर (कर्णधार), अमूल्य पांड्रेकर, दर्शन मिसाळ, अमित यादव, दीपराज गावकर, एकनाथ केरकर, फेलिक्स आलेमाव, श्रीकांत वाघ, लक्षय गर्ग, मलिकसाब सिरूर, समर दुभाषी, आदित्य कौशिक, विशंबर काहलोन, विजेश प्रभुदेसाई, शुभम रांजणे, सुयश प्रभुदेसाई, मंथन खुटकर, कश्यप बखले, निहाल सुर्लकर, मोहित रेडकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT