Goa: रुग्णवाहिका नसल्याने फुटबॉल सामना रद्द!

गोवा फुटबॉल (Goa football) असोसिएशनवर नामुष्की, चाहत्यांची मागितली माफी
GFA
GFADainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: रुग्णवाहिका (Ambulance) नादुरुस्त झाल्यानंतर, पर्यायी चालकही अनुपलब्ध ठरल्याने फुटबॉल सामना रद्द करण्याची नामुष्की मंगळवारी गोवा फुटबॉल असोसिएशनवर (GFA) आली, त्याबद्दल त्यांनी चाहत्यांची माफी मागत असमर्थता व्यक्त केली.

GFAच्या 20 वर्षांखालील तासा गोवा लीग फुटबॉल स्पर्धेतील साळगावकर एफसी व एफसी गोवा यांच्यातील सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर होणार होता. फिफा नियमावलीनुसार सामना केंद्रावर रुग्णवाहिका उपलब्ध असणे बंधनकारक आहे. मंगळवारी सामन्याच्या ठिकाणची रुग्णवाहिका नादुरुस्त झाली.

GFA
Goa: संघ दिवसभरात दोन वेळा गारद

रुग्णवाहिका सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराकडे अतिरिक्त रुग्णवाहिकेची मागणी केली, पण त्यांच्याकडे पर्यायी चालक नसल्यामुळे सामन्यासाठी दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे सामनाच रद्द करण्याची पाळी जीएफएवर आली. ही माहिती जीएफए सचिवांनी मंगळवारी संध्याकाळी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. असुविधेबद्दल GFA दोन्ही संघ, सामना अधिकारी, तसेच चाहत्यांचीही माफी मागितली.

पणजी फुटबॉलर्सचा विजय

तासा गोवा लीग 20 वर्षांखालील स्पर्धेत मंगळवारी बेताळभाटी येथील सामना ठरल्यानुसार झाला. या लढतीत पणजी फुटबॉलर्सने वास्को स्पोर्टस क्लबवर (sports club) 2-0 फरकाने निसटती मात केली. सामन्याच्या 19 व्या मिनिटास मॅक्झिमो डिकॉस्ता याने केलेल्या गोलमुळे पणजी फुटबॉलर्स संघ विश्रांतीस एका गोलने आघाडीवर होता. नंतर सामन्याच्या भरपाई वेळेत विजयी संघाचा दुसरा गोल वेलिंग्टन आल्मेदा याने नोंदविला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com