Goa Futsal Dainik Gomantak
क्रीडा

Goa: फुटसाल वर्चस्वासाठी आठ संघांत चुरस

Goa: स्पर्धा येत्या एक सप्टेंबरपासून नुवे येथे खेळली जाईल

दैनिक गोमंतक

पणजीः राज्यस्तरीय फुटसाल (Goa State Futsal) विजेतेपदासाठी आठ संघांत चुरस असेल. गोवा फुटबॉल असोसिएशनची (Goa Football Association) स्पर्धा येत्या एक सप्टेंबरपासून नुवे येथे खेळली जाईल. स्पर्धेचे यंदा पहिलेच वर्ष आहे. स्पर्धेचा अंतिम सामा 12 सप्टेंबरला होईल. सर्व लढती नुवे येथील एम्पायर स्पोर्टस मैदानावर होतील. विजेता संघ अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या राष्ट्रीय पातळीवरील फुटसाल स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करेल. स्पर्धेच्या अ गटात एफसी वायएफए, स्पोर्टिंग क्लब द गोवा, शिरवडे स्पोर्टस क्लब व यूथ क्लब ऑफ मनोरा हे संघ, तर ब गटात सांताक्रूझ क्लब केळशी, पणजी फुटबॉलर्स, गोवा वेल्हा स्पोर्टस क्लब, आंबेली स्पोर्टस क्लब या संघांचा समावेश आहे.

दोन्ही गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ही फेरी सात सप्टेंबरला होईल. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी स्पोर्टिंग क्लबसमोर एफसी वायएफए संघाचे, तर शिरवडे क्लबसमोर यूथ क्लब मनोरा संघाने आव्हान असेल. स्पर्धा फिफाच्या फुटसाल नियमानुसार खेळली जाईल, तसेच कोविड-19 प्रतिबंधक शिष्टाचाराचेही काटेकोर पालन केली जाईल, असे जीएफएने स्पष्ट केले आहे. स्पर्धेचा ड्रॉ जीएफए फुटसाल समितीचे अध्यक्ष बाबली मांद्रेकर, सहअध्यक्ष जॉन सिल्वा, जीएफए कार्यकारी समिती सदस्य वेल्विन मिनेझिस, फ्रान्सिस नुनीस, फ्रँकी फर्नांडिस, सचिव जोवितो लोपिस यांच्या उपस्थितीत झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT