Goa cricket association Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket संघाचा पुढील सराव घरच्या मैदानावर

Goa Cricket : दिल्ली दौरा आटोपून सीनियर संघ पाच ऑक्टोबरला परतणार

दैनिक गोमंतक

पणजीः दिल्ली (Delhi) दौरा आटोपून गोव्याचा सीनियर क्रिकेट संघ पाच ऑक्टोबरला गोव्यात परतणार आहे. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेऊन संघ घरच्या मैदानावरच सराव करेल, अशी माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (Goa Cricket Association) सचिव विपुल फडके (Vipul Fadke) यांनी दिली. पुदुचेरीत स्पर्धात्मक क्रिकेट सराव अशक्य ठरल्यानंतर गोव्याचा संघ दिल्लीस रवाना झाला असून ते काही सराव सामने खेळेल. सेनादलाविरुद्ध सामना झाला आहे. हरियाना, दिल्लीविरुद्ध सामने नियोजित आहेत. शिवाय काही क्लब संघाविरुद्धही लढती होतील, असे फडके यांनी सांगितले.

‘‘दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ गोव्याचे क्रिकेटपटू परगावी असतील. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेपूर्वी नियमानुसार विलगीकरण असेल. त्यापूर्वी खेळाडूंना आवश्यक विश्रांती मिळावी असे मत मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई यांनी नोंदविले आहे. त्यानुसार, गोव्यात परतल्यानंतर काही दिवस खेळाडूंना आराम मिळेल. त्यानंतर गोव्यात सराव सत्र होईल, तसेच 25 वर्षांखालील संघाविरुद्धही सामने खेळले जातील,’’ अशी माहिती फडके यांनी दिली. सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा एलिट अ गटात समावेश आहे. पंजाब, तमिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र, पुदुचेरी हे गोव्याचे गटातील प्रतिस्पर्धी आहेत. स्पर्धा चार नोव्हेंबरपासून लखनौ येथे खेळली जाईल. स्पर्धा नियमानुसार स्पर्धा केंद्रावर संघाचे कोविड-19 प्रतिबंधक विलगीकरण 27 ऑक्टोबरपासून सुरू होईल. त्यामुळे 26 ऑक्टोबरपर्यंत गोव्याच्या संघाला लखनौ येथे दाखल व्हावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

Mapusa: म्हापसा पालिका क्षेत्रातील बेवारस पाण्याच्या विहिरी विनावापर पडून, पालिकेचे दुर्लक्ष; उपाययोजना करण्याची मागणी

FC Goa vs Al Nassr: फातोर्डा मैदानाबाहेर कडक पोलिस बंदोबस्त, आज रंगणार एफसी गोवा-अल नस्सर यांच्यातील फुटबॉल सामना

Goa Politics: फातोर्ड्यात विरोधकांचा 'एकवट'! विरोधकांचे संघटितपणाचे प्रदर्शन; कॉंग्रेस, गोवा फॉरवर्ड, आरजीपीचे नेते एकत्र

Horoscope: सावधान! प्रेम जीवनात मोठे संकट! वृषभ-मकरसह 'या' 4 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा

SCROLL FOR NEXT