Goa Cricket team  Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याला विजयाची हुलकावणी, चिवट ओडिशाने पराभव टाळला

शतकवीर शंतनूची धूपरसह झुंजार भागीदारी

दैनिक गोमन्तक

पणजी : सलामीचा शंतनू मिश्रा याने शतक ठोकताना अर्धशतकवीर राजेश धूपर याच्यासमवेत चिवट लढा दिला. त्यामुळे गोव्याविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ओडिशाला पराभव टाळता आला. एलिट ड गट सामना रविवारी चौथ्या दिवसअखेर अनिर्णित राहिला.

ओडिशाने (Odisha) पहिल्या डावात आठ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांना अनिर्णित लढतीतून तीन गुण मिळाले, तर गोव्याला एका गुणावर समाधान मानावे लागले. चार दिवसीय सामना मोटेरा-अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट (Cricket) स्टेडियमच्या ब मैदानावर झाला. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबाद येथेच माजी विजेत्या मुंबईविरुद्ध होईल.

ओडिशाच्या शंतनूने 267 चेंडू किल्ला लढविताना 11 चौकारांसह 103 धावा केल्या, तर दुसऱ्या डावातही अर्धशतक करताना यष्टिरक्षक-फलंदाज राजेशने 177 चेंडूंत चार चौकारांसह 52 धावा केल्या. या जोडीने 332 चेंडूंत पाचव्या विकेटसाठी 119 धावांची मौल्यवान भागीदारी केली. गोव्यातर्फे पहिल्या डावात पाच गडी बाद केलेल्या शुभम रांजणेने दुसऱ्या डावात फक्त चार षटकेच गोलंदाजी केली.

गोव्याने ओडिशासमोर 387 धावांचे आव्हान ठेवले होते. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी बिनबाद 22 धावा केल्या होत्या. रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ओडिशाने दुसऱ्या डावात 7 बाद 239 धावा केल्या.

सकाळच्या सत्रात ओडिशाची 4 बाद 108 अशी स्थिती होती, तेव्हा गोव्याला विजय खुणावत होता. मात्र उपाहार ते चहापान हे पूर्ण सत्र शंतनू व राजेश यांनी गोव्याच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. मात्र शेवटच्या बारा षटकांचा खेळ खूपच नाट्यमय ठरला.

गोव्याचा (goa) ऑफस्पिनर अमित यादव याने राजेश धूपरला दर्शन मिसाळ याच्याकरवी बाद केले आणि शतकी भागीदारी फोडली. त्यावेळी सामना अनिर्णितावस्थेकडे झुकला होता. मात्र ओडिशाने 10 धावांत 3 विकेट गमावल्यामुळे 7 बाद 237 अशी स्थिती झाली आणि गोव्याच्या गोटात पुन्हा उत्साह आला. जम बसलेला शंतनू धावबाद झाला त्यावेळी दिवसातील 21 चेंडूंचा खेळ बाकी होता. देबब्रत प्रधान व बसंत मोहंती यांनी बाकी चेंडू संयमाने खेळत गोव्याचा संघ विजयाचा जल्लोष करणार नाही याची दक्षता घेतली.

गोवा, पहिला डाव ः 181 व दुसरा डाव ः 5 बाद 394 घोषित

ओडिशा, पहिला डाव ः 189 व दुसरा डाव ः 100 षटकांत 7 बाद 239 (अनुराग सारंगी 28, शंतनू मिश्रा 103, संदीप पट्टनाईक 32, सुभ्रांशू सेनापती 2, गोविंदा पोद्दार 3, राजेश धूपर 52, अभिषेक राऊत 5, देबब्रत प्रधान नाबाद 2, बसंत मोहंती नाबाद 0, श्रीकांत वाघ 12-3-28-1, लक्षय गर्ग 12-2-47-1, दर्शन मिसाळ 32-9-76-2, अमित यादव 26-11-24-2, शुभम रांजणे 4-0-13-0, अमूल्य पांड्रेकर 14-2-42-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

SCROLL FOR NEXT