बॅलट मतांसाठी बाबूंकडून ‘ऑफर’

मतदारांना पैशांचे आमिष; ऑडिओ क्लिप असल्याचा गिरीश चोडणकर यांचा दावा
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच मतदारसंघांत अटीतटीच्या लढती झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे प्रत्येक मत उमेदवारांसाठी बहुमूल्य आहे. पोस्टल बॅलट मतदान सध्या सुरू असल्याने ही मते मिळवण्यासाठी पैशांच्या जोरावर ती विकत घेण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. केपेचे भाजप उमेदवार व उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर बॅलट मतांसाठी पैशांची ऑफर देत असल्याची ऑडिओ क्लिप आपल्‍याकडे असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे कवळेकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे तीनवेळा काँग्रेसच्या तिकिटावर केपे मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता ते चौथ्यांदा भाजपच्‍या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. यावेळी या मतदारसंघातील लढत अटीतटीची झाली आहे. त्यामुळे कवळेकर हे चिंतेत आहेत. मते वाढविण्यासाठी आता पोस्टल बॅलट मतेच उरलेली आहेत.

Girish Chodankar
गोवा अॅग्री-बायोटेक स्टार्टअपने 4.3 कोटींचा उभारला निधी, शेतकऱ्यांना होणार फायदा

निवडणूक जिंकण्याची ठाम आशा नसलेल्या उमेदवारांनी या पोस्टल बॅलट मतांच्या कर्मचाऱ्यांशी आपल्या कार्यकर्त्यांकरवी किंवा स्वतःहून संपर्क साधण्यास सुरूवात केली असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी अशा प्रकरणात गुंतलेल्या उमेदवाराचे नाव उघड केले नव्हते. चोडणकर यांनी काल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटून निवडणूक आचारसंहितेचा भंग होत असल्याची तोंडी माहिती दिली होती. आज त्यांनी ट्विट करून कवळेकर यांच्या नावाचा पर्दाफाश करत व त्यासंदर्भातची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला.

या प्रकरणानंतर अनेक उमेदवारांनी सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. सुमारे 15,716 सरकारी कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलट मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने मुरगावचे माजी आमदार तथा माजी मंत्री मिलिंद नाईक यांच्‍याविरोधात कथित लैंगिक अत्याचारप्रकरणाचा आरोप केला होता. तसेच या प्रकरणाच्‍या चौकशी मागणी केली होती. मात्र दिलेल्या मुदतीत सरकारने काहीच न केल्याने नाईक यांच्‍या नावासह व्हिडिओ क्लिपद्वारे काँग्रेसने (Congress) पर्दाफाश केला होता.

Girish Chodankar
राज्यपालांनी शिवोलीसह सांगे वासीयांना दिलं मोठं आश्वासन

आता मतदानानंतर उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर (Babu Kavalekar) यांना काँग्रेसने जाळ्यात पकडले आहे. यापूर्वी कवळेकर यांच्या मोबाईलवरून अश्‍लील चित्रफित व्हायरल झाली होती, तेव्हाही ते अडचणीत आले होते. मात्र त्याच्याशी काहीच संबंध नाही असा दावा करून त्‍यांनी त्याची तक्रार सायबर कक्षाकडे दिली होती. या प्रकरणाचा तपास सध्या बंद ठेवला गेला आहे. काँग्रेसमध्ये असताना केपे येथे मटका जुगार व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला होता, त्‍यावेळीही कवळेकर अडचणीत आले होते. आता पुन्‍हा एकदा त्‍यांच्‍यासमोर संकट उभे ठाकले आहे.

निवडणूक आयोगाकडे तक्रार

पोस्टल बॅलट मतदारांची यादी सत्ताधारी पक्षाकडे पोहोचली आहे. ही यादी मुख्य निवडणूक (Election) अधिकाऱ्याच्या कार्यालयातून दिली गेल्याचा संशय आहे. त्यामुळे काही निवडणूक अधिकाऱ्यांशी सत्ताधारी पक्षाने संधान साधले आहे. या मतदारांना शोधून काढून त्यांची मते मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी संपर्क साधणे सुरू केले आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग तसेच लोकशाहीची पायमल्ली होत आहे. या प्रकरणाची चौकशी तक्रार मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com