एकनाथ केरकर Dainik Gomantak
क्रीडा

Ranji Trophy: सेनादल संकटात, गोव्याला विजयाची संधी

एकनाथ केरकर याच्या दमदार नाबाद दीडशतकाच्या बळावर गोव्याने रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सेनादलावर ३०८ धावांची मोठी आघाडी संपादन केली.

किशोर पेटकर

एकनाथ केरकर याच्या दमदार नाबाद दीडशतकाच्या बळावर गोव्याने रणजी करंडक क्रिकेट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सेनादलावर ३०८ धावांची मोठी आघाडी संपादन केली.

पालम-नवी दिल्ली येथील एअरफोर्स मैदानावर क गट सामना सुरू आहे. सेनादलाच्या पहिल्या डावातील १७५ धावांना उत्तर देताना गोव्याने गुरुवारी डाव उपाहारानंतर ९ बाद ४८३ धावांवर घोषित केला.

तिसऱ्या दिवसअखेर सेनादलाने तिसऱ्या दिवसअखेर २ गडी गमावून १३९ धावा केल्या. शुक्रवारी सामन्याचा शेवटचा दिवस असून यजमान संघ १६९ धावांनी मागे आहे. शुभम रोहिल्ला (५२) व रवी चौहान (नाबाद ६८) यांनी सेनादलास ९६ धावांची सलामी दिल्यानंतर गोव्याचा मध्यमगती विजेश प्रभुदेसाई याने दोन गडी बाद केले.

एकनाथचे पहिले रणजी शतक

गोव्याच्या पहिल्या डावात यष्टिरक्षक- फलंदाज एकनाथ १५६ धावांवर नाबाद राहिला. त्याने ३०९ चेंडूंचा सामना करताना १७ चौकार लगावले. २९ वर्षीय खेळाडूचे हे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिलेच शतक ठरले. एकंदरीत अकरावा, तर गोव्यातर्फे नववा सामना खेळताना एकनाथने कारकिर्दीत पहिल्यांदाच शतक वेस ओलांडली.

गोव्याच्या शेपटाचाही तडाखा

गोव्याने गुरुवारी सकाळी कालच्या ५ बाद २८१ वरून कर्णधार दर्शन मिसाळला लगेच गमावले. एकनाथ व दर्शन यांनी सहाव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर गोव्याच्या शेपटाचा तडाखा सेनादलाच्या गोलंदाजांना बसला.

मोहित रेडकरने कारकिर्दीतील पहिले अर्धशतक नोंदविताना एकनाथसह सातव्या विकेटसाठी ८० धावांची खेळी केली. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर (२७) व लक्षय गर्ग (३२) यांनीही जोरदार फलंदाजी केली. त्यामुळे गोव्याला मोठी धावसंख्या उभारता आली. एकनाथ-अर्जुन यांनी आठव्या विकेटसाठी ४५, तर एकनाथ-लक्षय यांनी नवव्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

सेनादल, पहिला डाव ः सर्वबाद १७५.

गोवा, पहिला डाव (५ बाद २८१ वरून) ः १५५.२ षटकांत ९ बाद ४८३ घोषित (एकनाथ केरकर नाबाद १५६, दर्शन मिसाळ ५९, मोहित रेडकर ५६, अर्जुन तेंडुलकर २७, लक्षय गर्ग ३२, पुलकित नारंग ४-१४१, मोहित राठी ३-९४).

सेनादल, दुसरा डाव ः ४० षटकांत २ बाद १३९ (शुभम रोहिल्ला ५२, रवी चौहान नाबाद ६८, शमशेर यादव १, राहुलसिंग गहलौत नाबाद १०, लक्षय गर्ग ५-०-३०-०, अर्जुन तेंडुलकर ५-०-१६-०, मोहित रेडकर १३-३-३७-०, विजेश प्रभुदेसाई ८-१-३१-२, दर्शन मिसाळ ९-२-१८-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मानवी क्रौर्याची परिसीमा! शीर, हात आणि पाय नसलेला आढळला मृतदेह, खुनाच्या भयानक घटनेने खळबळ; पोलिसांकडून तपास सुरु

Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा 'राऊडी'पणा महागात, महागड्या गोलंदाजीनंतर अम्पायरनं फटकारलं; काय घडलं नेमकं? VIDEO

25 जणांचे बळी घेणाऱ्या नाईट क्लब आगीच्या दुर्घटनेची हायकोर्टाकडून दखल; बेकायदा बांधकामे, व्यवसाय रडारवर

Goa Delhi Indigo Flight: लग्नाला जाताना पॅनिक अटॅक, अचानक बेशुद्ध पडली, डॉ अंजली निंबाळकरांनी वाचवला अमेरिकन तरुणीचा जीव; गोवा-दिल्ली फ्लाईटमधील थरार! VIDEO

Suryakumar Yadav: 'आता हा शॉट खेळू नको' सूर्याच्या खराब कामगिरीवर गावसकर नाराज, दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT