Goa cricket team Defeats Uttar Pradesh Dainik Gomantak
क्रीडा

उत्तर प्रदेश संघाला नमवत गोव्याच्या गोलंदाजांची उत्तम कामगिरी

सी. के. नायडू क्रिकेट; 179 धावांच्या उत्तरादाखल उत्तर प्रदेश 4 बाद 25

दैनिक गोमन्तक

पणजी : फलंदाजांची निराशा केल्यानंतर गोव्याच्या वेगवान गोलंदाजांनी जोरदार प्रतिहल्ला चढवला, त्यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक (25वर्षांखालील) क्रिकेट (Cricket) सामन्यात उत्तर प्रदेशची मंगळवारी पहिल्या दिवसअखेर घसरगुंडी उडाली.

एलिट एफ गटातील चार दिवसीय सामन्यास मंगळवारपासून अळूर-बंगळूर येथे सुरवात झाली. प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याचा पहिला डाव 179 धावांत आटोपला. नंतर दिवसअखेर उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) 4 बाद 25 अशी स्थिती झाली. ते अजून 154 धावांनी मागे आहेत. गोव्याच्या ऋत्विक नाईकने भन्नाट मारा करताना 7 धावांत 3 गडी टिपले, तर हेरंब परबने एका फलंदाजास माघारी पाठवले. हेरंबने डावातील पाचव्याच चेंडूवर अंचित यादव याला पायचित बाद केल्यानंतर ऋत्विकने दोन धावांच्या फरकाने उत्तर प्रदेशच्या तिघा फलंदाजांना पॅव्हेलियनची दिशा दाखवली.

त्यापूर्वी, गोव्याच्या डावातही 4 बाद 24 अशी घसरगुंडी उडाली होती. मागील सामन्यात शतक केलेला कर्णधार दीपराज गावकर शून्यावर बाद झाल्यामुळे गोव्याला (goa) मोठा धक्का बसला. नंतर विश्वंबर काहलोन (43) व तुनीष सावकार (24) यांनी पाचव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला सावरता आले. नंतर तळात ऋत्विक नाईकने (नाबाद 31) किल्ला लढवल्यामुळे गोव्याला पावणेदोनशे धावांचा टप्पा गाठता आला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 68 षटकांत सर्वबाद 179 (ईशान गडेकर 9, वैभव गोवेकर 2, मंथन खुटकर 11, विश्वंबर काहलोन 43, दीपराज गावकर 0, तुनीष सावकार 24, सोहम पानवलकर 12, मोहित रेडकर 11, ऋत्विक नाईक नाबाद 31, धीरज यादव 8, हेरंब परब 18, कुणाल त्यागी 2-41, करण चौधरी 1-25, कुणाल यादव 2-23, प्रिन्स यादव 1-8, कृतग्य सिंग 1-54, समीर चौधरी 3-26).

उत्तर प्रदेश, पहिला डाव ः 11 षटकांत 4 बाद 25 (आंजनेय सूर्यवंशी नाबाद 16, हेरंब परब 6-2-18-1, ऋत्विक नाईक 5-2-7-3).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व आहे - सुलक्षणा सावंत

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT