Goa Cricket: Shikha Pandey Dainik Gomantak
क्रीडा

Goa Cricket: नेट शिबिरासाठी शिखा पांडेची उत्सुकता

Goa Cricket: इंग्लंडहून परतल्यानंतर विलगीकरणात; पुढील आठवड्यापासून सराव शक्य

किशोर पेटकर

पणजी : इंग्लंडचा क्रिकेट दौरा (England Cricket Tour) आटोपून मायदेशी परतलेली भारताची महिला कसोटी वेगवान (Indian Women Test Fast Bowler) गोलंदाज शिखा पांडे (Shikha Pandey) पुढील आठवड्यात गोव्याच्या सीनियर महिला संघ शिबिरात सहभागी होण्याचे संकेत आहेत. सध्या 32 वर्षीय खेळाडू विलगीकरणात असून लवकरच सराव सत्र सुरू करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. पर्वरी (Porvorim) येथील जीसीए अकादमीतील (GCA Academy) इनडोअर नेट संकुलात 29 सदस्यीय संभाव्य महिला संघाचे शिबिर सोमवारपासून सुरू झाले आहे. मुख्य प्रशिक्षक अनंत तांबवेकर व सहाय्यक प्रशिक्षक अनुराधा रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंचा इनडोअर नेटमध्ये सराव सुरू आहे. या शिबिरात पुढील आठवड्यापासून सहभागी होण्याची इच्छा शिखाने गोवा क्रिकेट असोसिएशनकडे (Goa Cricket Association) व्यक्त केली आहे. ती गोव्याच्या संघाची कर्णधारही आहे. यावर्षी मार्चमध्ये जयपूर येथे झालेल्या सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत एलिट क गटात शिखाने गोव्याचे नेतृत्व केले होते. तेव्हा गोव्याने पाचपैकी तीन सामने जिंकले होते, तर दोन सामने गमावले.

शिखाने इंग्लंडहून गोव्यात परतल्यानंतर संपर्क साधला असून गोव्याच्या संभाव्य संघ शिबिरात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक शिष्टाचारानुसार परदेश प्रवासानंतरचे आवश्यक विलगीकरण संपवून शिबिरात दाखल होईल, अशी माहिती जीसीए क्रिकेट प्रशिक्षण व ऑपरेशन्स संचालक प्रकाश मयेकर यांनी बुधवारी दिली. भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा 14 जुलै रोजी संपला. त्यानंतर खेळाडू मायदेशी परतले आहेत. शिखा इंग्लंड दौऱ्यात वेगवान गोलंदाजीत भारताची प्रमुख खेळाडू होती. एकमेव कसोटीत, तसेच प्रत्येकी तीन सामन्यांच्या एकदिवसीय व टी-20 मालिकेतील सर्व सामन्यांत तिने नव्या चेंडूने भारतीय संघाचे आक्रमण सांभाळले.

स्पर्धेत खेळण्याची शक्यता अंधूक

भारतीय महिला क्रिकेट संघ येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यात 19 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत भारतीय संघ तीन एकदिवसीय, एक दिन-रात्र कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळेल. शिखाची इंग्लंड दौऱ्यातील कामगिरी लक्षात घेता तिची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही निवड अपेक्षित मानली जाते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वेळापत्रकानुसार सीनियर महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 21 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर या कालावधीत नियोजित आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाल्यास शिखा सीनियर एकदिवसीय स्पर्धेत गोव्याकडून खेळू शकणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT