Goa Cricket Live Dainik Gomantak
क्रीडा

व्हेटरन्स क्रिकेट स्पर्धेत मडगाव, डिचोली-सत्तरीचे विजय

अनुक्रमे फोंडा, पणजी संघाला नमविले

Kishor Petkar

पणजी : अखिल गोवा व्हेटरन्स क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी मडगावने फोंडा संघावर नऊ विकेट, तर डिचोली-सत्तरी संघाने पणजीवर चार विकेट राखून मात केली.

पर्वरी येथे सामन्याच्या प्रारंभ माजी सभापती डॉ. राजेश पाटणेकर, गोवा व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद फडते यांच्या उपस्थितीत झाला. सांगे येथे स्पर्धेचे उद्‍घाटन डॉ. सतीश कुडचडकर यांनी केले.

सांगे मैदानावर मडगाव व फोंडा यांच्यातील सामना एकतर्फी ठरला. नितीन कालेकर, प्रशांत लोटलीकर व सुदेश प्रभुदेसाई यांनी फोंड्याचा डाव 93 धावांत गुंडाळल्यानंतर दामोदर रेडकरच्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर मडगाव संघाने सामना 15.2 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात जिंकला.

पर्वरी येथे पणजी व्हेटरन्सने 9 बाद 139 धावा केल्या. नंतर प्रसाद सुर्लकर, ऋषिकेश यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर डिचोली-सत्तरी संघाने चार विकेट व सहा चेंडू राखून विजय मिळविला.

संक्षिप्त धावफलक

फोंडा व्हेटरन्स : 20 षटकांत सर्वबाद 93 (जयेश बोरकर 27, रघुवीर लोटलीकर 18, नितीन कालेकर 2-15, प्रशांत लोटलीकर 3-10, सुदेश प्रभुदेसाई 2-9, व्यंकटेश नेवगी 2-5, शैलेश नाईक 1 विकेट) पराभूत वि. मडगाव व्हेटरन्स : 15.2 षटकांत 1 बाद 94 (दामोदर रेडकर नाबाद 50, आशिष पाटणेकर नाबाद 28 धावा, रघुवीर लोटलीकर 1 विकेट), सामनावीर : दामोदर रेडकर.

पणजी व्हेटरन्स : 20 षटकांत 9 बाद 139 (स्विटेश वेर्णेकर 34, इफ्तिकार आगा 25, देविदास खोलकर 26, विनय पालेकर 21, सूरज सावळ 2-23, अभिजित तळेकर 2-24, संदेश ठाकूर, विजय कुडतरकर प्रत्येकी 1 विकेट) पराभूत वि. डिचोली-सत्तरी : 19 षटकांत 6 बाद 140 (प्रसाद सुर्लकर 40, ऋषिकेश 32, कैलास 28, विनय पालेकर 3-26, कपिले आंगले, ॲमलॉन डिसोझा, आनंद माजाळीकर प्रत्येकी 1 विकेट), सामनावीर :अभिजित तळेकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

SCROLL FOR NEXT