football Coach clifford miranda Dainik Gomantak
क्रीडा

Odisha FC : क्लिफर्ड ओडिशाच्या जबाबदारीतून मुक्त; सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा

किशोर पेटकर

Super Cup-winning coach Clifford Miranda : गोव्याचे क्लिफर्ड मिरांडा यांनी सहाय्यक प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ओडिशा एफसीने त्यांना शुक्रवारी जबाबदारीतून मुक्त केले. त्यांच्या जागी आता मुख्य प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्यासमवेत 36 वर्षीय फ्लॉईड पिंटो सहाय्यक प्रशिक्षक असतील.

क्लिफर्ड गतवर्षी ओडिशा एफसी संघात दाखल झाले होते, त्यापूर्वी भारताचे माजी आंतरराष्ट्रीय मध्यरक्षक एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक होते.

40 वर्षीय मार्गदर्शकाने प्रभारी प्रशिक्षक या नात्याने यावर्षी एप्रिलमध्ये ओडिशाला सुपर कप जिंकून दिला होता, तसेच गोकुळम केरळास हरवून भुवनेश्वरमधील संघ एएफसी कप स्पर्धेच्या गट टप्प्यासाठी पात्र ठरला होता.

सुपर कप स्पर्धेच्या इतिहास विजेतेपद पटकावणारे पहिले भारतीय प्रशिक्षक हा मान क्लिफर्ड यांना प्राप्त झाला होता. ओडिशा एफसीने 2022-23 मोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत सहावा क्रमांक मिळवून प्ले-ऑफ फेरीसाठी पात्रता मिळविली होती.

आयएसएल स्पर्धा संपल्यानंतर जोसेप गोम्बाऊ यांनी मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुपर कप व एएफसी कप प्ले-ऑफ फेरीत ओडिशा एफसी संघ क्लिफर्ड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला.

ओडिशा क्लबकडून कृतज्ञता व्यक्त

‘‘२०२२-२०२३ मोसमात ओडिशा एफसी संघाची प्रगती आणि यशस्वी वाटचालीतील अतुलनीय योगदानाबद्दल आम्ही क्लिफर्ड यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्याची पोचपावती देत आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबच्या इतिहासात सुपर कपच्या रुपात आम्ही पहिला करंडक जिंकू शकलो, तसेच एएफसी कप स्पर्धेच्या गट टप्प्यासाठीही प्रथमच पात्रता मिळविली,’’ असे ओडिशा क्लबने क्लिफर्ड यांना निरोप देताना अधिकृत संकेतस्थळावर नमूद केले.

‘‘क्लबमध्ये मोठ्या पदाचा प्रस्ताव आम्ही दिला होता, मात्र क्लिफर्ड यांनी वेगळा प्रवास आणि नवे आव्हान स्वीकारण्यास पसंती दिली, आमचा त्यांना नेहमीच पाठिंबा राहील,’’ असे ओडिशा क्लबने पुढे नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT